Dunkley Fastest Fifty In WPL : महिला आयपीएलमध्ये आज गुजरात आणि आरसीबी यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातची सलामी फलंदाज सोफिया डंकले हिने विस्फोटक फलंदाजी केली. तिने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावलं. हे वुमन्स आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक होय. सोफिया डंकले हिच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात 202 धावांचा डोंगर उभारला. 


232 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या -
सोफियाने प्रथम फलंदाजी करताना 28 चेंडूत 11 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 65 धावांचा पाऊस पाडला. सोफियाने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. सोफियाने या डावात 232 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. याआधीच्या दोन सामन्यात सोफियाची बॅट शांत होती.  पण आज आरसीबीविरोधात सोफियाने धावांचा पाऊस पाडला. 






सोफिया डंकले आणि हरलीन देओल यांची विस्फोटक फलंदाजी 
सोफिया डंकले शिवाय हरलीन देओल हिनेही दमदार प्रदर्शन केले. हरलीन देओलने 45 चेंडूत 67 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान हरलीन देओल हिने 9 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याशिवाय  एश्ले गार्डेनर, दयालन हेमलता आणि सभ्भीनेनी मेघना यांनी अनुक्रमे 19, 16 आणि 8 धावांचं योगदान दिले. आरसीबीसाठी हीथर नाइट ने 2 विकेट घेतल्या. तर मेगान स्कुत आणि श्रेयंका पाटिल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  


















दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे ?


आरसीबी- स्मृती मंधाना (कर्णधार), सोफी डिवाइन, एलिस पॅरी, हीथर नाइट, रिचा घोष (विकेटकीपर), पूनम खेमनार, कनिका आहूजा, श्रेयांका पाटील, मेगन शट, रेणुका ठाकुर सिंह, प्रीती बोस.


गुजरात जायंट्स- सब्भिनेनी मेघना, सोफिया डंकले, हरलीन देओल, एनाबेल सदरलँड, सुषमा वर्मा (विकेटकीपर), एशले गार्डनर, डायलान हेमलता, स्नेह राणा (कर्णधार), किम गर्थ, मानसी जोशी, तनुजा कंवर.