India vs Australia 4th Boxing Day Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाच्या अडचणी संपताना दिसत आहेत. पहिल्या कसोटीपासूनच टीम इंडियातील एक ना एक खेळाडू जखमी होत आहे. पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल दुखापतग्रस्त झाल्याने तो संघाचा भाग होऊ शकला नाही. आता बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला दुखापतीचे ग्रहण लागले आहे. मेलबर्न कसोटीपूर्वी दोन खेळाडूंना दुखापत झाल्याची बातम्या येत असून त्यामुळे कॉम्बिनेशन बदलणार का प्रश्न सर्वांना पडला आहे. 


भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. मालिकेतील पुढचा सामना मेलबर्नमध्ये 26 डिसेंबरला होणार आहे. या सगळ्या दरम्यान भारतीय संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma Knee Injury At MCG) आणि स्टार खेळाडू केएल राहुलला (KL Rahul Finger Injury) चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी दुखापत झाली आहे. जी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी आहे.


केएल राहुल जखमी (KL Rahul Finger Injury)


ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यापूर्वी टीम इंडिया मेलबर्नमध्ये सराव करत आहे. सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करत असताना त्याच्या हातात चेंडू लागला. त्यानंतर टीम इंडियाच्या फिजिओने त्याच्यावर उपचार केले. सराव करताना त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आणि त्यानंतर तो खूपच अस्वस्थ दिसत होता. त्याच्या दुखापतीबाबत संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयकडून कोणतीही विशेष माहिती देण्यात आलेली नाही, मात्र ही दुखापत मोठी असेल आणि केएल राहुल चौथ्या सामन्याला मुकला तर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का असेल.






सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये राहुल उपचारादरम्यान उजवा हात धरलेला दिसत आहे. राहुल सध्याच्या दौऱ्यात फॉर्मात आहे, त्याने सहा डावात 47 च्या सरासरीने 235 धावा केल्या आहेत. राहुलने आतापर्यंत दोन अर्धशतके झळकावली असून तिसऱ्या सामन्यात त्याने 84 धावांची शानदार खेळी केली. त्या सामन्यात त्याला शतक झळकावता आले नाही, पण त्याच्या खेळीमुळे टीम इंडिया त्या सामन्यात फॉलोऑनपासून वाचली आणि भारतीय संघ तो सामना अनिर्णित राखू शकला.


रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यावर लागला चेंडू अन्.... (Rohit Sharma Knee Injury)


रविवारी मेलबर्नमध्ये सराव करताना रोहित शर्माच्या डाव्या गुडघ्यावर चेंडू लागला होता. भारतीय कर्णधाराची दुखापत किती गंभीर आहे आणि तो बॉक्सिंग डे कसोटीत भाग घेऊ शकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दुखापतीनंतर रोहित शर्मा खुर्चीवर बसला आणि फिजिओने आईस पॅक लावला. मात्र, काही वेळाने रोहित आरामात दिसला. सुरुवातीला त्याला वेदना होत असल्याचे दिसून आले. दुखापत फारशी गंभीर नसून बॉक्सिंग डे कसोटीला अजून काही दिवस शिल्लक आहेत.






रोहित शर्माचा फ्लॉप शो सुरूच...


बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये रोहितने आतापर्यंत 2 कसोटी खेळल्या आहेत. भारतीय कर्णधार दोन्ही कसोटीत फ्लॉप दिसला आहे. दोन सामन्यांच्या 3 डावात हिटमॅनच्या बॅटमधून फक्त 19 धावा आल्या आहेत.