Anmolpreet Singh Century : आयपीएल 2025चा मेगा लिलाव गेल्या महिन्याच्या 24 आणि 25 तारखेला जेद्दाह येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अनेक खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात पैशांचा वर्षाव करण्यात होता. पण असे अनेक खेळाडू होते ज्यांना कोणी विकत घेतले नाही. आता अशाच एका न विकल्या गेलेल्या खेळाडूने सर्व आयपीएल संघांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. खरं तर, 26 वर्षीय भारतीय फलंदाजाने झंझावाती शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. या फलंदाजाने इतक्या कमी चेंडूंमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम केला, ज्यामुळे शाहिद आफ्रिदीचा 37 चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रमही मोडला. आता हा फलंदाज लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज बनला आहे.


या 26 वर्षीय फलंदाजाने केवळ शाहिद आफ्रिदीचाच नाही तर युसूफ पठाणचाही विक्रम मोडला. याआधी युसूफ पठाणने 40 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता, जो लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वात जलद शतकाचा विक्रम होता. पठाणने 2009-10 मध्ये बडोद्याकडून खेळताना हा पराक्रम केला होता.






आयपीएल लिलावात इग्नोर


आपण ज्या फलंदाजाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव अनमोलप्रीत सिंग आहे. आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात अनमोलप्रीत विकला गेला नाही. या लिलावानंतर सुमारे एक महिन्यानंतर अनमोलप्रीतने 2024-25 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये पंजाबकडून खेळताना केवळ 35 चेंडूत शतक झळकावण्याचा मोठा पराक्रम केला. अशा प्रकारे लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात वेगवान भारतीय शतकाचा विक्रम मोडीत निघाला. सर्वात वेगवान शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज युसूफ पठाण होता, ज्याने 40 चेंडूत शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता.


अनमोलप्रीत सिंगचा विश्वविक्रम अवघ्या 6 चेंडूंनी मोडण्यात मुकला. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम 22 वर्षीय ऑस्ट्रेलियन फलंदाज जेक फ्रेजर-मॅकगर्कच्या नावावर आहे. जेक फ्रेझरने 2023 साली मार्श कप स्पर्धेत दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून तस्मानियाविरुद्ध खेळताना अवघ्या 29 चेंडूंमध्ये झंझावाती शतक झळकावून मोठा विक्रम केला होता.


लिस्ट ए क्रिकेटमधील चेंडूंच्या बाबतीत सर्वात जलद शतक


29 - जेक फ्रेझर-मॅकगर्क (125), 2023
31 - एबी डिव्हिलियर्स (149), 2015
35 - अनमोलप्रीत सिंग (115*), 2024
26 - कोरी अँडरसन (131*), 2014
36 - ग्रॅहम रोज (110), 1990
37 - शाहिद आफ्रिदी (102), 1996 


हे ही वाचा -


Ind vs Aus 4th Test : बॉक्सिंग-डे कसोटीपूर्वी वातावरण तापलं! विराटनंतर आता ऑस्ट्रेलियन मिडियानं जडेजाला घेरलं; नक्की काय घडलं?


ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये 'या' दिवशी भारत-पाकिस्तान भिडणार, जाणून घ्या कुठं पाहता येणार हाय-व्होल्टेज सामना?