Australia vs India 4th Test : भारतासोबत खेळल्या जाणाऱ्या मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ड्रायव्हिंग सीटवर दिसत आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 470 धावा केल्या आहेत. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघाने 311 धावसंख्येवरून डावाला सुरुवात केली आणि स्टीव्ह स्मिथच्या शतकाच्या जोरावर कांगारू संघ शेवटच्या 4 विकेट्समध्ये 159 धावा जोडण्यात यशस्वी ठरला. बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय वेगवान गोलंदाजांना दुसऱ्या दिवशी कोणतीही धार दाखवली नाही, पण रवींद्र जडेजाने खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत डावात एकूण 3 विकेट घेतल्या.
पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 6 गडी गमावून 311 धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ आणि कर्णधार पॅट कमिन्स यांनी मिळून डाव पुढे नेला आणि सातव्या विकेटसाठी 112 धावांची शतकी भागीदारी केली. त्यानंतर मिचेल स्टार्कही बराच वेळ क्रीजवर खेळला आणि स्मिथसोबत त्याने 44 धावांची भर घातली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा (57 धावा), मार्नस लॅबुशेन (72 धावा) आणि सॅम कॉन्स्टास (60 धावा) यांनी अर्धशतके झळकावली होती.
स्टीव्ह स्मिथने रचला इतिहास
स्टीव्ह स्मिथने दुसऱ्या दिवशी आपल्या कसोटी कारकिर्दीतील 34 वे शतक पूर्ण केले. आता तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम इंग्लंडच्या जो रूटच्या नावावर होता, ज्याने टीम इंडियाविरुद्ध आतापर्यंत 10 शतक ठोकले आहेत. आकाशदीपचा चेंडूवर स्मिथची विकेट विचित्र पद्धतीने पडली.
सर रवींद्र जडेजाची कमाल
स्टीव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स यांच्या शतकी भागीदारीने मेलबर्न कसोटीत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले होते. एकवेळ कांगारू संघाने 6 गडी गमावून 411 धावा केल्या होत्या. वेगवान गोलंदाजीला धार नव्हती, अशा स्थितीत रवींद्र जडेजाने कमान हाती घेतली, आधी पॅट कमिन्स आणि नंतर मिचेल स्टार्कची विकेट घेतली. त्याने या डावात एकूण 3 विकेट घेतल्या.
हे ही वाचा -