Virat Kohli Fined for Sam Konstas : मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासशी पंगा घेणे विराट कोहलीला चांगलेच महागात पडले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच रेफरीने या घटनेची दखल घेतली आणि कोहलीला सामन्याच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी विराट कोहलीला त्याच्या मॅच फीच्या 20 टक्के दंड आणि एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
विराट कोहलीला दंड का ठोठावला?
मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 19 वर्षीय युवा खेळाडू सॅम कॉन्स्टासने पदार्पणाच्याच सामन्यात आपली प्रतिभा दाखवली आणि अर्धशतक झळकावून टीम इंडियावर दबाव आणला. दरम्यान, 11 ओव्हर संपल्यानंतर सॅम कॉन्स्टास दुसऱ्या टोकाला जात असताना विराट कोहली त्याच्या जवळ आला आणि त्याच्या खांद्याला धक्का मारला, यानंतर दोघांमध्ये शाब्दिक युद्धही पाहायला मिळाले.
विराट कोहलीने चूक केली मान्य
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मॅच रेफरींनी विराट कोहलीशी संपूर्ण घटनेबद्दल बोलले. माजी भारतीय कर्णधाराने आपली चूक मान्य केली आणि त्यामुळे प्रकरण पुढे गेले नाही. त्याला 20 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि एक डिमेरिट पॉइंट देऊन सोडून देण्यात आले. मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांना ही घटना लेव्हल वन गुन्हा असल्याचे आढळले, परिणामी मॅच फीमधून दंड आकारला गेला.
19 वर्षीय कॉन्स्टासने कसोटी पदार्पणात केवळ 52 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. जेव्हा तो कोहलीशी भिडला तेव्हा तो 38 चेंडूत 27 धावा करून खेळत होता. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर स्कूप्स आणि रॅम्प शॉट्स खेळले, कॉन्स्टासने 65 चेंडूत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 60 धावा केल्या. लंच ब्रेकपूर्वी तो रवींद्र जडेजाचा बळी ठरला.
हे ही वाचा -