Ind vs Aus 3rd Test : गाबा टेस्टमध्ये भारत संकटात! जैस्वाल 4, कोहलीच्या फक्त 3 धावा, गिलचीही दांडी गुल्ल, इंडियाची पडझड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे.
Australia vs India 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. पहिल्या डावात टीम इंडियाची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा कोलमडली आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी गाबा कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाची पुन्हा एकदा निराशा केली. मिचेल स्टार्कने पुन्हा एकदा जैस्वालला आपला शिकार बनवले. यानंतर गिलही लवकर बाद झाला. माजी कर्णधार किंग कोहली पण विशेष काही करू शकला नाही. लंच ब्रेकपर्यंत भारताने 22 धावांत तीन विकेट गमावल्या.
गाबा कसोटीच्या पहिल्या डावात टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा एकदा फेल ठरले. या सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी आले. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने गोलंदाजीची सुरुवात केली. जैस्वालने स्टार्कच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर जैस्वाल आज मोठी खेळी करेल असे चाहत्यांना वाटत होते, मात्र पुढच्याच चेंडूवर स्टार्कने जैस्वालला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. जैस्वाल पुन्हा एकदा स्टार्कचा बळी ठरला.
Lunch has been taken here on Day 3.
— BCCI (@BCCI) December 16, 2024
India lose three wickets with 22 runs on the board.
Scorecard - https://t.co/dcdiT9NAoa… #AUSvIND pic.twitter.com/CbmNLMP3lj
जैस्वाल बाद झाल्यानंतर टीम इंडियाला शुभमन गिलकडून अपेक्षा होत्या, पण शुभमन गिलही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. जोश हेझलवूडने शुभमन गिलला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पहिल्या डावात केवळ 1 धावा करून गिल बाद झाला.
विराट कोहली पुन्हा ठरला फेल...
पहिल्या डावात विराट कोहलीकडून चाहत्यांना चांगल्या खेळीची अपेक्षा होती, पण कोहलीने पुन्हा एकदा चाहत्यांची आणि संघाची निराशा केली. विराट कोहलीही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. जोश हेझलवूडने विराट कोहलीला बाद केले. अवघ्या 3 धावा करून कोहली पॅव्हेलियनमध्ये परतला. आता गाबा टेस्टमध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढताना दिसत आहे.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
गाबा कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने सात विकेट्सवर 405 धावांवरून खेळाला सुरुवात केली आणि 40 धावा करताना शेवटच्या तीन विकेट्स गमावल्या. ॲलेक्स कॅरीने अर्धशतक झळकावले. मिचेल स्टार्कला बुमराहने तर नॅथन लायनला सिराजने बाद केले. त्याचवेळी आकाश दीपने कॅरीला बाद करून ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिली विकेट घेतली. स्टार्कने 18 तर लियॉनने दोन धावा केल्या. कॅरीने 88 चेंडूंत 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. बुमराहने सहा विकेट घेतल्या. त्याचवेळी सिराजला दोन विकेट मिळाल्या. आकाश दीप आणि नितीश यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. या कसोटीत हेडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील नववे शतक तर स्मिथने 33वे शतक झळकावले. स्मिथ 190 चेंडूत 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा करून बाद झाला तर हेड 160 चेंडूत 18 चौकारांच्या मदतीने 152 धावा करून बाद झाला.
हे ही वाचा -