INDvsAUS : ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. आयपीएल 2020 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना भारतीय संघात संधी मिळाली आहे. दुखापतग्रस्त रोहित शर्मा आणि इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी -20 टीममधून बाहेर आहे. लोकेश राहुल वन डे, टी20 चा उपकर्णधार असणार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन टी -20, तीन एकदिवसीय आणि चार कसोटी सामने खेळणार आहे. 27 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा भारताच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर आयपीएल 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून शानदार कामगिरी करणाऱ्या ऑफ स्पिनर वरुण चक्रवर्तीला ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी टी -20 संघात स्थान मिळालं आहे.
रोहित शर्माला आयपीएलमध्ये दुखापत झाली आहे आणि म्हणूनच गेल्या दोन सामन्यात तो खेळू शकलेला नाही. त्यामुळे टी -20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इशांत शर्माच्या नावाचाचा संघात समावेश नाही. बीसीसीआयने म्हटलं की, बीसीसीआयची मेडिकल टीम रोहित आणि ईशांतवर नजर ठेऊन आहेत. संजू सॅमसनलाही या संघात स्थान मिळालं आहे.ऋषभ पंतचं नाव संघात नाही.
शुभमन गिलला वनडे संघात संधी मिळाली आहे. मयंक अग्रवाललाही एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. शार्दुल ठाकूरलाही एकदिवसीय संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय आणि टी -20 सामन्यात रोहितच्या जागी मयंक अग्रवालची निवड झाली आहे. त्यामुळे मयंक शिखर धवन याच्यासोबत डावाची सुरुवात करताना दिसू शकेल. सलामीवीर म्हणून शुभमन गिल हा तिसरा पर्याय असू शकेल.
कसोटीमध्ये शुभमन गिलला कायम ठेवण्यात आले आहे.ऋषभ पंतला रिद्धिमान साहासह सामील करण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणे कसोटी संघाचा उपकर्णधार असणार आहे. कसोटीत मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ असे दोन सलामीवीर पर्याय आहेत. तर केएल राहुल तिसरा पर्यायही आहे. मात्र राहुलचा अनुभव पाहता त्याला पसंती दिली जाऊ शकते.
कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, शुभमन गिल, रिद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
एकदिवसीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर
टी -20 संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार आणि विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती