Aus vs Ind 1st Test : पृथ्वी शॉ भारतीय संघातील तरुण खेळाडूंपैकी एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पृथ्वी शॉ मात्र फारसं चांगलं प्रदर्शन करु शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पृथ्वीने अनेक चुका केल्या आहेत. त्यामुळे सध्या तो नेटकऱ्यांच्या टीकेचा सामना करत आहे.
पृथ्वी शॉने कसोटी सामन्यात बुमराहने टाकलेला चेंडू फटकावणाऱ्या लबुशेनचा एक अगदी सोपा कॅच सोडला आणि त्यानंतर दुसऱ्या डावात अवघ्या चार धावांवरच माघारी परतला. आपल्या छोट्या चुका आणि खराब कामगिरी यांमुळे नेटकरी पृथ्वी शॉला ट्रोल करत आहेत. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पृथ्वी शॉवरील मीम्सचा जणू पाऊसच पाडला.
दरम्यान, पृथ्वी शॉने पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावांत केवळ चार धावा केल्या, दोन्ही डावांत तो क्लिन बोल्ड झाला. दोन्ही डावांत त्याचा आऊट होण्याची पद्धत सारखीच होती. पहिल्या डावांचाच अॅक्शन रिप्ले पृथ्वीने दुसऱ्या डावांत दाखवला. पण, दुसऱ्या डावांत अंतर केवळ गोलंदाज आणि चार धावांचं होतं. पहिल्या डावात मिचेल स्टॉर्कने पृथ्वीला क्निन बोल्ड केलं होतं. तर दुसऱ्या डावांत पेंट कमिंसने त्याला क्लिन बोल्ड केलं होतं.
टीम इंडिया 62 धावांनी आघाडीवर
अॅडलेड येथे खेळवल्या जाणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियातील डे-नाईट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व निर्माण केलं. भारतीय गोलंदाजांच्या पध्दतशीर माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 192 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 62 धावांची आघाडी मिळाली आहे. तसेच दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने आपल्या दुसऱ्या डावांत एक विकेट गमावत नऊ धावा केल्या. भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ अवघ्या 4 धावांवर आऊट झाला. तर मयंक अग्रवालने नाबाद 5 धावा केल्या. तर नाबाद असलेला बुमराह 11 चेंडूंचा सामना करुनही आपलं खातं उघडू शकलेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
- अश्विनची धमाकेदार गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावात गुंडाळला
- IND Vs AUS | पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड; टीम इंडियाच्या स्टार फलंदाजाचं वक्तव्य
- Ind vs Aus Stumps Day 1: अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताची 6 बाद 233 धावांची मजल
- IND Vs AUS | फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरही रोहित शर्माचा कसोटी मालिकेसाठीचा प्रवास खडतर