IND VS AUS: अॅडलेड येथे खेळवल्या जाणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलियातील डे-नाईट कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व निर्माण केलं. भारतीय गोलंदाजांच्या पध्दतशीर माऱ्यामुळं ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव केवळ 191 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 53 धावांची आघाडी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार टिम पेन यांने सर्वाधिक 73 धावा केल्या. तो नाबाद राहिला. मार्नस लाबुशॅनने 47 धावांचं योगदान दिलं. यांच्या व्यतिरिक्त कॅमेरुन ग्रीन याने 11 धावा तर मिशेल स्टार्कन 15 धावा केल्या.
अॅडलेड कसोटीमध्ये पहिल्या डावात अश्विनने आपल्या गोलंदाजीची चमक दाखवत चार विकेट्स घेतल्या. त्यांने सर्वप्रथम स्टीव्ह स्मिथ (1) ला बाद केलं. त्यानंतर ट्रेव्हिस हेड (7) आणि कसोटी सामन्यात पदार्पण करत असलेल्या कॅमरुन ग्रीन (11) यांना तंबूत धाडलं. त्यानंतर त्यानं नाथन लिओन (10) यालाही माघारी धाडलं. या प्रमुख खेळाडूंची विकेट अश्विननं घेतल्यानं ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला. याव्यतिरिक्त उमेश यादवने तीन आणि जसप्रीत बुमराहने दोन विकेट घेतल्या.
गुरुवारी भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात भारताने 244 धावांपर्यंत मजल मारली होती. ऑस्ट्रेलियाचा डाव 191 धावांवर आटोपल्यानं पहिल्या डावात भारताला 53 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळाली आहे.
महत्वाच्या बातम्या: