IND Vs AUS | एडिलेडमध्ये खेळवण्यात येणाऱ्या डे-नाईट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने 6 विकेट्स गमावत 233 धावा केल्या. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कालच्या सामन्याच्या पहिल्या सत्रात भारताने 188 धावा करत तीन विकेट्स गमावले होते. त्यानंतर शेवटच्या सत्रात टीम इंडियाने आणखी तीन विकेट गमावले. शेवटच्या सत्रातील टीम इंडियाच्या खराब कामगिरीमुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचं पारडं जड झाल्याचं भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर
पुजारानेही मान्य केलं आहे.


चेतेश्वर पुजारा म्हणाला की, पहिल्या कसोटी सामन्यात भारताची परिस्थिती फारशी चांगली नाही. पुजाराने आशा व्यक्त केली आहे की, दुसऱ्या दिवशी टीम इंडिया चांगलं प्रदर्शन करेल आणि 275 ते 350 धावांचं लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी होईल.


पुजाराने कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. पुजारा म्हणाला की, सुरुवातीला काही विकेट गमावल्यानंतरही आम्ही चांगल्या परिस्थितीत होतो. कोहली आणि रहाणे यांनी उत्तम खेळी केली. माझा अजूनही विश्वास आहे की, अश्विन आणि साहा संघाला चांगला स्कोर मिळवून देण्यात यशस्वी होतील. जर आम्ही याच विकेटवर ऑस्ट्रेलियासमोर 275 ते 350 धावांचं आव्हान ठेवलं, तर टीम इंडियाचं पारडं या सामन्यात थोडं जड होईल."


ऑस्ट्रेलियाचं पारडं जड


भारतासाठी पहिल्या डावात 43 धावांची खेळी करणारा पुजारा म्हणाला की, "एक वेळ होती जेव्हा आम्ही डॉमिनेटेड स्थानावर होतो. परंतु, रहाणे आणि कोहली बाद झाल्यानंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला एक अॅव्हान्टेज दिलं आहे. पण मला अजुनही असं वाटतंय की, सामन्यात टीम इंडियाची परिस्थिती उत्तम आहे."


भारताने सुरुवातीच्या सत्रात अत्यंत धीम्या गतीनं फलंदाजी केली. भारताने 55 ओव्हर्समध्ये तीन विकेट्स गमावर 107 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सत्रात मात्र टीम इंडियाने वेगाने धावा केल्या. दुसऱ्या दिवशी भारतच्या वतीने नाबादअश्विन आणि साहा फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरतील.


महत्त्वाच्या बातम्या :