India vs Australia: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia tour of India) दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीच्या (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर (Punjab Cricket Association IS Bindra Stadium) खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येक सामन्यात थरार पाहायला मिळतो. आजपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेतही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या अखेरच्या पाच टी-20 सामन्यांचे निकाल पाहुयात.
हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेचं निकाल (फेब्रुवारी, 2019)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी 2019 मध्ये दोन सामन्यांची टी-20 मालिके खेळण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया भारताचा 2-0 असा पराभव केला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात (24 फेब्रुवारी 2019) ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताला तीन विकेट्सनं पराभूत केलंय. त्यानंतर या मालिकेतील अखेरच्या सामन्यात (27 फेब्रुवारी 2019) मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला अपयश आलं. या सामन्यातही भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा निकाल (डिसेंबर, 2020)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डिसेंबर 2020 मध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली आहे. ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात (4 डिसेंबर 2020) भारतानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यातही (6 डिसेंबर 2020) भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली. या मालिकेतील तिसऱ्या आणि औपचारिक सामन्यात (8 डिसेंबर 2020) ऑस्ट्रेलियाच्या संघानं 12 धावांनी भारताचा पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला हा अखेरचा सामना आहे. त्यानंतर दोन्ही संघात आज प्रथमच टी-20 सामना खेळला जाणार आहे.
हे देखील वाचा-