IND vs AUS 1st T20I Full Match Highlights:  अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन विकेटने पराभव केला.  ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांचे आव्हान भारताने अखेरच्या चेंडूवर दोन विकेट राखून पूर्ण केले. फिनिशर रिंकूने षटकार ठोकत भारताला विजयी केले. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनी झंझावती अर्धशतके ठोकली. ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा याने दोन विकेट घेतल्या.  जोश इंग्लिंश याने ठोकलेल्या झंझावती शतकाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने 208 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरदाखल भारताने हे आव्हान दोन विकेट राखून सहज पार केले. 


विश्वचषकात फेल गेलेल्या सूर्यकुमार यादव याने झंझावती अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 209 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय खराब झाली. ऋतुराज गायकवाड याला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर यशस्वी जायस्वालही 21 धावांवर तंबूत परतला. यशस्वी जायस्वालने 8 चेंडूत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 21 धावांचे योगदान दिलेय. 22 धावांवर भारताने दोन विकेट गमावल्या होत्या. पण त्यानंतर ईशान किशन आणि सूर्याने मोर्चा संभाळला. 


ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. 67 चेंडूमध्ये या दोघांनी 112 धावांची भागीदारी केली. दोघांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना कोणतीही संधी दिली नाही. ईशान किशन याने 39 चेंडूत 58 धावांची खेळी केली. यामध्ये 5 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश होता. तर सूर्यकुमार यादव याने 42 चेंडूत 80 धावांचे योगदान दिले. सूर्या ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक गोलंदाजांची शाळा घेतली. सूर्याने चौफेर फटकेबाजी केली. सूर्याने आपल्या खेळीत 4 षटकार आणि 9 चौकार लगावले. 


सूर्या आणि ईशान किशन बाद झाल्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली. एकापाठोपाठ एक विकेट गेल्या. तिलक वर्मा 12 धावा काढून बाद झाला. अक्षर पटेल दोन धावांचे योगदान देऊ शकला. रवि बिश्नोई आणि अर्शदीप यांना खातेही उघडता आले नाही. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला रिंकू याने फिनिशिंग केले. अखेरच्या षटकात भारताने तीन विकेट्स गमावल्या. पण रिंकून हार मानली नाही. रिंकून षटकार मारुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रिंकूने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. 


ऑस्ट्रेलियाकडून तनवीर संघा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकात 47 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. नॅथन इलिस आणि मार्कस स्टॉयनिस यांना विकेट मिळाली नाही. स्टॉयनिस याने 3 षटकात 36 धावा खर्च केल्या. तर इलिस याने 4 षटकात 44 धावा दिल्या.  सीन एबॉट याने 4 षटकात 43 धावा खर्च करत एक विकेट घेतली. मॅथ्यू शॉर्ट याने 1 षटकात 13 धावा खर्च करत एक विकेट घेतली. जेसन बेहरनड्रॉफ याने 4 षटकात 25 धावा खर्च करत एक विकेट गेतली. त्याने एक षटकही निर्धाव फेकले.