Mohammed Shami On Rahul Gandhi's Statement  : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पनौती असा अप्रत्यक्ष उल्लेख केला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाची फायनल झाली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. पण पनौती सामना पाहायला गेल्यामुळे भारताने सामना गमावला, असं वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर गदारोळ झाला होता. यावर आता मोहम्मद शामीची प्रतिक्रिया आली आहे. 


मोहम्मद शामीला पत्रकारांनी राहुल गांधींच्या पनौती वक्तव्यावर प्रश्न विचारला. त्यावर बोलताना शामी म्हणाला की, “यार, हे कॉन्ट्रोवर्सी वाले प्रश्न मला समजत नाही. तुम्ही बेसिक गोष्टींवर लक्ष द्या. गेल्या दोन महिन्यांपासून तुम्ही जे कष्ट केलेत त्यावर लक्ष केंद्रित करा. हा राजकीय अजेंडा मला समजत नाही.” दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमध्ये फायनलचा सामना पाहण्यासाठी गेले होते. फायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटण्यासाठी पोहोचले होते. मोदींनी भारतीय खेळाडूंशी चर्चा केली आणि मोहम्मद शमीला मिठीही मारली, ज्याचा फोटो शमीने शेअर केला .


टीम इंडियातील कोणत्या उणिवा सुधारल्या जाऊ शकतात, असा प्रश्नही शामीला विचारण्यात आला. त्यावर शामी म्हणाला की,  “ विश्वचषकात टीम इंडियातील सर्वांनी चांगली कामगिरी केली.  11 सामन्यापैकी 10 सामने जिंकले. आत्मविश्वासाची कमतरता नव्हती, कौशल्याची कमतरता नव्हती. मला असे वाटते की एक वाईट दिवस असू शकतो, जो कधीही येऊ शकतो. माझ्या मते तो दिवस आमचा नव्हता.”






मोहम्मद शामीची विश्वचषकातील कामगिरी - 


मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने अवघ्या 7 सामन्यात 24 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. फायनलमध्ये त्याला एक विकेट मिळाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही विश्वचषकाचा अंतिम सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले. विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी भारतीय पंतप्रधानांना पनौती संबोधले. सोशल मीडियावर तो शब्दही ट्रेंड करत होता. 


राहुल गांधी काय म्हणाले होते ?


पीएम मोदी (Narendra Modi) म्हणजे पनौती मोदी आहेत, भारतीय टीम (Team India) चांगलं खेळत होती, पण हे पनौती तिकडे गेले आणि आपल्या टीमला हरवलं अशी  टीका काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली. ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते.