IND vs PAK :आयसीसी महिला विश्वचषकात (ICC Womens world cup 2022) भारतीय महिलांनी (Indian Women Cricket team) आतापर्यंत दोन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. त्यामुळे आता आजचा पाचवा सामना जिंकण त्यांच्यासाठी महत्त्वाचं असेल. स्पर्धेत पहिल्या सामन्यात भारतीय महिलांनी पाकिस्तानला (India vs Pakistan) मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडने भारतावर विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय महिलांनी वेस्ट इंडीजला (India vs West Indies) मात दिली. पण चौथ्या सामन्यात इंग्लंडने 4 विकेट्सनी विजय मिळवल्याने भारत सध्या चार गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान आज सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध असल्याने हा सामना भारत जिंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कुठे खेळवला जाणार सामना?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघातील हा सामना न्यूझीलंडच्या इडन पार्क, ऑकलंड या ठिकाणी खेळवला जाणार आहे.
कधी खेळवला जाणार सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघातील हा सामना आज अर्थात 19 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, हा सामना सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे.
कसा पाहाल सामना?
हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क या चॅनेलवर पाहता येणार आहे. तसंच हॉटस्टार या अॅपवरही हा सामना पाहता येईल.
भारतीय संघ:
मिथाली राज (कर्णधार), तानिया भाटीया (यष्टीरक्षक), झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, मेघना सिंह, पुजा वस्त्रकर, रेणुका सिंह, शेफाली वर्मा, रिचा घोष, यस्तीका भाटीया.
हे देखील वाचा-
- Kapil Dev : भारताचे महान ऑलराऊंडर कपिल देव यांचा आवडता ऑलराऊंडर खेळाडू माहित आहे का?
- Virat Kohli : कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी चाहते मैदानात, पुढे विराटने जे केले ते तुम्हीच पाहा
- IND vs SL Test : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी, अर्धशतक ठोकत नवा रेकॉर्ड केला नावावर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha