Team India Squad For Afghanistan T20 Series : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (IND vs AFG) टी-20 मालिका 11 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. टीम इंडिया (Team India) 11 जानेवारीपासून अफगाणिस्तानविरुद्धच्या (India vs Afghanistan) तीन सामन्यांच्या T20 मालिकेत सहभागी होणार आहे. भारतीय संघ व्यवस्थापन या मालिकेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी देते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. संघ व्यवस्थापनाकडून आज भारतीय संघातील खेळाडूंची नाव जाहीर करण्यात येणार आहेत. अफगाणिस्तान संघ काहीसा कमजोर असला तरी, आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने अफगाणिस्तान विरुद्धची टी20 मालिका भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.


रोहित शर्मा आणि विराट कोहली बाहेर?


अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात येण्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, या मालिकेत विराट आणि रोहितला संधी दिल्यास हे दोघेही टी-20 विश्वचषक 2024 चा भाग असतील, असं मानलं जात आहे. पण, या मालिकेत दोघेही खेळण्याची शक्यता कमी आहे. आगामी इंग्लंड कसोटी मालिका लक्षात घेता संघ निवड समिती अफगाणिस्तान मालिकेत स्टार खेळाडूंना विश्रांती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही तज्ज्ञांच्या मते, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेमध्ये रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे, पण संघ समिती विराट कोहलीला आराम देईल, असं म्हटलं जात आहे.


भारत विरुद्ध अफगाणिस्ताव टी-20 मालिका


सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्यासारख्या महत्त्वाच्या टी-20 खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे, भारतीय संघ व्यवस्थापन टी-20 विश्वचषकासाठी संघ नियोजन करताना अडचण निर्माण होऊ शकते. त्यानंतर, इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापन जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसारख्या वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत, टी-20 विश्वचषकासाठी संघ निवड आणि अफगाणिस्तान मालिकेत समतोल शोधण्यासाठी संघ व्यवस्थापनाकडून फारसं काही साध्य होणार नाही.


टी-20 विश्वचषकासाठीच्या संघाबाबत संभ्र कायम


टी-20 विश्वचषकासाठी संभाव्य संघाबाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरे अफगाणिस्तान मालिकेत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आयपीएम 2024 (IPL 2024) मधील भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर टी20 विश्वचषकात कोणाला स्थान मिळेल किंवा नाही ठरेल. अफगाणिस्तानविरुद्ध भारताचा संघ कसा असू शकतो, हे पुढे वाचा.


अफगाणिस्तान टी-20 मालिकेसाठी संभाव्य टीम इंडिया


रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.