MS Dhoni Smoking Hookah : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये धोनी हुक्का  (Hookah)पिताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगल्या आहेत. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. काही जणांनी धोनीच्या कृत्यावर जोरदार टीका केली आहे. तर काही लोक त्याचे हे व्यक्तीगत आयुष्य असल्याचे म्हणत आहेत. 


एम.एस. धोनी (MS Dhoni) गेल्या काही दिवसांपासून दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आणि धोनीचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या धोनीच्या हुक्का पीत असलेल्या व्हिडिओमुळे चाहत्यांना धक्काच बसलाय. व्हिडिओमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings)कर्णधार त्याच्या स्टाईलिश हेअर स्टाईलमध्ये दिसत आहे. यावेळी त्याने ब्लॅक कलरचा सूट घातलाय. 


ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केला होता खुलासा?


ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याने एस.एस.धोनीबाबत एक खुलासा केला होता. धोनी युवा खेळाडूंसोबत हुक्का पितो, असा धक्कादायक दावा त्याने केला होता. बेली 2009 ते 2012 दरम्यान चेन्नई सुपर किंग्ज या संघाचा भाग होता. याशिवाय तो 2016 मध्ये पुणे सुपर जायंट्स या संघाचा भाग होता. यावेळी पुण्याच्या संघाचे नेतृत्व धोनीचं करत होता. 






ऑस्ट्रेलियन संघाने 2018 मध्ये एक व्हिडिओ शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये जॉर्ज बेली म्हणाला होता की, "धोनीला हुक्का प्यायला आवडतो. त्यामुळे तो नेहमी त्याच्या रुममध्ये हुक्का ठेवतो. शिवाय त्याची रुम सर्वांसाठी खुली असते. तुम्ही त्याच्या रुममध्ये गेलात तर तुम्हा अनेक युवा खेळाडू दिसतील. 


2024 मध्ये पुन्हा चेन्नईचे नेतृत्व करणार धोनी 


आयपीएल 2024 मध्ये महेंद्रसिंह धोनी पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात दिमाखदार विजय मिळवला होता. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली असताना संपूर्ण सिझन खेळण्यास तो यशस्वी ठरला होता. दरम्यान धोनीने गुडघ्याची शस्त्रक्रिया केली आहे. आता तो पूर्णपणे फिट होऊन मैदानात उतरणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असेल, असे बोलले जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Team India returned to Mumbai : द. आफ्रिकेवर ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भारतात परतली टीम इंडिया, रोहितचे चाहत्यांबरोबर फोटोशूट