एक्स्प्लोर

IND vs SA 3rd ODI: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्लीन स्वीप टाळण्यासाठी भारतीय संघात मोठे बदल?

भारत (India) - दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) एकदिवसीय मालिकेत भारताचा पहिल्या दोन सामन्यात पराभव झाला. आज होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात क्लीन स्वीप टाळण्यासाठी भारतीय संघ काही बदलांसह मैदानात उतरू शकतो

IND vs SA 3rd ODI : भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत (One Day Series) भारताचा दोन सामन्यात पराभव झाला आहे. परंतु, आज होणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्लीन स्वीप टाळण्यासाठी भारतीय संघ काही बदलांसह मैदानात उतरू शकतो.  

पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाची रणनीती पूर्णपणे फसल्याने संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही तर जसप्रीम बुमराह वगळता उर्वरित भारतीय गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांना केवळ सात गडी बाद करता आले. बुमराहने पहिल्या सामन्यात चार तर दुसऱ्या सामन्यात तीन गडी बाद केले. 
 
दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर रविचंद्रन अश्विन आणि भुवनेश्वर कुमार सारखे अनुभवी गोलंदाज अपयशी ठरले आहेत. पहिल्या दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरल्यामुळे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुढील आजच्या संघात काही बदल करू शकतात.  

दरम्यान, के.  एल. राहुलने पहिल्या दोन सामन्यांमध्ये फलंदाजीत निराशा केली. एकदिवसीय सामन्यांमध्ये आवश्यक असणारा स्ट्राईक रोटेट करण्यात तो अपयशी ठरला. तर विराट कोहलीने पहिल्या सामन्यात 51 धावा केल्या. याशिवाय अय्यर श्रेयस आणि व्यंकटेश हे दोघेही आतापर्यंत छाप पाडू शकलेले नाहीत, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे.

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 7 विकेटने पराभव 
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा सात विकेटने पराभव केला. भारताने दिलेलं 288  धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिका संघाने तीन गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केलं. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्कारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात पराभव झाल्यामुळे कसोटीनंतर भारतीय संघाने एकदिवसीय मालिकाही गमावली. 

महत्वाच्या बातम्या

 

महत्त्वाच्या बातम्या

IND Vs WI 5th T20 LIVE Score Update : भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
भारत-वेस्ट इंडिजमध्ये आज आरपारची लढाई! भुवनेश्वरची एन्ट्री, वैभव खेळणार की नाही? जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Hong Kong Sixes : भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
भुवनेश्वर कुमार संघाबाहेर, बदली खेळाडूची घोषणा; हाँगकाँग सिक्सेस 2026 स्पर्धेसाठी कृणाल पांड्याकडे टीम इंडियाची धुरा! पाहा संपूर्ण Squad
Ind Squad vs Nz ODI Series : जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय
जडेजा-शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद, पंतही वनडेतून OUT; न्यूझीलंड दौऱ्यावर संघ जाहीर, BCCI चे 5 चक्रावणारे निर्णय

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
Embed widget