India A vs Bangladesh A ACC Mens Emerging Teams Asia Cup 2023 : इमर्जिंग आशिया कप 2023 च्या उपांत्यफेरीत भारताच्या युवा ब्रिगेडने बांगलादेशचा अ चा पराभव केला. बांगलादेश अ संघाचा पराभव करत भारताने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात भारत अ संघाने बांगलादेश अ संघाचा 51 धावांनी पराभव केला. भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 212 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरदाखल बांगलादेशचा संघ 160 धावांपर्यंत मजल मारु शकला. भारतीय संघ आता फायनलमध्ये पोहचलाय. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये रविवारी फायनलचा थरार रंगणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानने श्रीलंका संघाचा साठ धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश मिळवला. बांगलादेशविरोधात भारताच्या निशांत सिंधु याने 5 विकेट घेतल्या.
भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.1 षटकात 211 धावांपर्यंत मजल मारली. यश धुल याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. यश धुल याने 85 चेंडूत 66 धावांची खेळी केली. या खेळीत यश धुल याने सहा चौकार लगावले. अभिषेक शर्मा याने 63 चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 धावांची खेळी केली. सलामी फलंदाज साई सुदर्शन याने 24 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 21 धावांची खेळी केली. रियान पराग याला मोठी खेळी करता आली नाही. त्याला फक्त 12 धावा करता आल्या. निकिन जोस याने 17 धावांचे योगदान दिले. मानव सुतार याने 21 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये तीन चौकार लगावले.
भारताने दिलेल्या २१२ धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना १६० धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेश संघाने तनजीम हसन याने 51 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याने 56 चेंडूत 8 चौकार लगावले. मोहम्मद नईम याने 38 धावांचे योगदान दिले. कर्णधार सैफ हसन याने 22 धावांची खेळी केली. हसन जॉय याने 20 धावा जोडल्या. त्याशिवाय इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. भारताने बांगलादेशचा 51 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. आता रविवारी पाकिस्तानसोबत लढाई होणार आहे.
टीम इंडियाकडून निशांत सिंधु याने शानदार गोलंदाजी केली. त्याने 8 षटकात 20 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट घेतल्या. मानव सुतार याने 8.2 षटकात 32 धावांच्या मोबद्लयात 3 विकेट घेतल्या. अभिषेक शर्मा आणि युवराज सिंह डोडिया यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.