Ayesha Naseem Profile : पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील आयशा नसीम हिने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. आयशा नसीम हिचे वय फक्त 18 वर्ष आहे. त्यानंतरही तिने क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आयशाच्या या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. आयशा नसीम हिने मुस्लिम धर्मामुळे निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतलाय.  आयशा नसीम म्हणाली की,  आपलं आयुष्य इस्लाम धर्मानुसार जगायचं आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. 


पाकिस्तानसाठी 4 वनडे आणि 30 टी20 सामने खेळली आयशा नसीम


पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील हिटर्समध्ये आयशा नसीम हिचे नाव आहे. आयशाने आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली आहे. पण आता यापुढे आयशा क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही.   पाकिस्तान महिला क्रिकेट टीमसाठी खेळणाऱ्या आयशा नसीम हिचा जन्म 7 ऑगस्ट 2004 रोजी एबटाबादमध्ये झाला होता.  आयशा विस्फोटक फलंदाजीसोबत राइट आर्म मीडियम फास्ट गोलंदाजही आहे.  पाकिस्तानसाठी आयशाने आतापर्यंत चार वनडे आणि 30 टी20 सामने खेळले आहेत. आयशाने 2020 मध्ये पाकिस्तान टीमसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्याच वेळी, तिने वर्षाच्या सुरुवातीला आयर्लंडविरुद्ध टी-20 महिला विश्वचषकाअंतर्गत शेवटचा सामना खेळला होता. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तिने भारतीय महिला संघाविरुद्ध फटकेबाजी केली. या सामन्यात त्याने केवळ 25 चेंडूंचा सामना केला. दरम्यान, दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने तिने नाबाद 43 धावा केल्या.


कसे राहिलेय आयाशा नसीमचं करियर


आयाशा नसीम हिने  4 वनडे सामन्यात 33 धावा कल्या आहेत.  आयाशा नसीमचा सर्वोच्च धावसंख्या  16 आहे.  आयाशा नसीम हिने टी20 मध्ये १२ च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. आयशाने 30 टी20 सामन्यात 369 धावा काढल्या आहेत.  सर्वाधिक धावसंख्या नाबाद 45 धावा इतकी आहे. आयशाने एकूण २० षटकार लगावले आहेत. आयशा हिला एकही अर्धशतक आणि शतक झळकावता आले नाही. तळाला वेगाने धावा जमवण्यात आयशा तरबेज आहे.