IND vs WI, 3rd T20, Warner Park Cricket Stadium : आज भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West indies) यांच्यात पुन्हा एकदा टी20 सामना खेळवला जात आहे. काल अर्थात 1 ऑगस्ट रोजी सामना झाल्यानंतर आज लगेचच पुन्हा एकदा दोन्ही संघ आमने-सामने आले आहेत. आजचा सामना देखील सेंट किट्स येथील वॉर्नर पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. सध्या टी20 मालिकेत दोन्ही संघानी एक-एक सामना जिंकल्यामुळे मालिका बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकणारा संघ आघाडी घेऊ शकतो. तर या सामन्यात मैदानाची स्थिती तसंच सामना होणाऱ्या ठिकाणचं हवामान कसं असेल, ते पाहूया...


अधिक आंतरराष्ट्रीय सामने झाले नसलेल्या वॉर्नर पार्कमध्ये फलंदाजी करणं काहीसं अवघड असल्याने चेस करणाऱ्या संघाला अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. तसंच गोलंदाजांना अधिक मदत या पिचवर मिळत असल्याने आज देखील नाणेफेक जिंकणार संघ प्रथम गोलंदाजी निवडण्याची शक्यता अधिक आहे. कारण काल झालेल्या सामन्यातही प्रथम फलंदाजी करुन वेस्ट इंडीजने विजय मिळवला. त्यामुळे आजच्या सामन्यात नाणेफेक महत्त्वाची असेल. या मैदानात भारत दुसराच सामना खेळत आहे. दुसरीकडे वेस्ट इंडीजने मात्र याठिकाणी 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यातील 7 जिंकले देखील आहेत.याशिवाय दोन सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला असून दोन सामने अनिर्णीत राहिले आहेत.  


हवामानाची स्थिती कशी?


हवामानाची माहिती देणाऱ्या Weather.com ने दिलेल्या माहितीनुसार आज सेंट किट्स येथील सामना होणाऱ्या ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. ज्यामुळे किमान 1 तास तरी पाऊस नक्कीच पडेल. वातावरणही 26 ते 30 अंश सेल्सियसमध्ये असणार असून वातावरणार 72 ते 81 टक्के आर्द्रता असणार आहे. पावसाची शक्यता कालच्या तुलनेत काहीशी अधिक असून 21 ते 22 टक्के इतकी पावसाची शक्यता आहे. 



संभाव्य भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक, दीपक हुडा, हार्दीक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.  


संभाव्य वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, हेडन वॉल्श, अकेल हुसेन.



हे देखील वाचा-