IND vs SL 2nd Test Live: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. बंगळुरुच्या (Bengaluru) एम चिन्नास्वामी स्डेडियमवर (M.Chinnaswamy Stadium) सुरु असलेल्या या सामन्यात सध्यातरी भारताने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात 252 धावा करुवन श्रीलंकेला 109 धावांत भारताने सर्वबाद केलं. त्यानंतर दुसऱ्या भारताच्या डावात भारतीय फलंदाज मैदानावर आहेत. लंचब्रेकपूर्वी भारताने 342 धावांची आघाडी घेतली आहे.


या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ श्रीलंकेला क्लीन स्वीप देऊ शकतो. टी20 मालिकेप्रमाणे भारताकडे व्हाईट वॉश देण्याची ही नामी संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिलीच कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघानं एक डाव आणि 222 धावांनी जिंकला होता. आता दुसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतली. ज्यानंतर भारतीय फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. पण श्रेयस अय्यरच्या 92 धावांनी भारतीय संघाचा डाव 252 पर्यंत पोहोचवला. ज्यानंतर भारतीय संघाला 252 धावांत बाद केल्यानंतर प्रत्युत्तरदाखल मैदानात उतरलेल्या श्रीलंका संघाची फलंदाजीही ढासळली.


भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे लंकेच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. एँजलो मॅथ्युजचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. मॅथ्युजने 43 धावांची खेळी केली. दिमुथ करुणारत्ने 4, लाहिरू थिरिमाने 8, कुसल मेंडिस 2, धनंजया डी सिल्वा 10 आणि चरिथ असलंका 5 यांना आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. निरोशन डिकवेला 13 आणि लसिथ एम्बुल्डेनिया शून्य धावसंख्येवर नाबाद आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामीला दोन तर अक्षर पटेलला एक विकेट मिळाली. दुसऱ्या दिवशी भारताने आणखी उत्तम गोलंदाजी करत 109 धावांत श्रीलंकेच्या संघाला गुंडाळले असून भारताने त्यानंतर दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली. यावेळी विहारी आणि शर्माने अर्धशतकी भागिदारी केली पण रोहित 46 धावांवर बाद होताच विहारीही 35 धावा करुन तंबूत परतला. मग पंतने 28 चेंडूत अर्धशतक झळकावलं. पण तो बाद झाल्यानंतर आता लंचब्रेकपूर्वी 47 ओव्हरनंतर भारताने 5 विकेट गमावत 199 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha