India vs South Africa 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात सुरु टी20 मालिकेतील दुसरा सामना आज पार पडणार आहे. पहिला सामना भारताने 8 विकेट्सच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताने जिंकल्यास भारत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेऊ शकेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ आपलं स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. त्यांनी सामना जिंकल्यास मालिकेत दोघेही 1-1 अशी बरोबरी घेतील. तर आजचा हा अत्यंत महत्त्वाचा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल जाणून घेऊ... 


कधी आहे सामना?


आज अर्थात 2 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होणार आहे.


कुठे आहे सामना?


हा सामना गुवाहाटीच्या बरासपरा क्रिकेट स्टेडियमवर (Barsapara Cricket Stadium, Guwahati) खेळवला जाणार आहे.  


कुठे पाहता येणार सामना?


या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   


कसे आहेत दोन्ही संघ?


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह (दुखातग्रस्त), शाहबाज अहमद.


भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, रिसोबा, रिसोबा रुसो, तबरीझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स.




हे देखील वाचा-