IND vs SA : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दुसरा टी20 सामना कटकच्या बाराबती मैदानात (Barabati Stadium, Cuttack) खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले असून भारत पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका विजय मिळवून आघाडी वाढवण्याची प्रयत्नशील असेल.  सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार असून 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होणार आहे.


सामना पार पडणाऱ्या बाराबती मैदानाची खेळपट्टी महत्त्वाची भूमिका बजावेल. दरम्यान या ठिकाणी आतापर्यंत पार पडलेल्या दोन टी20 सामन्यांमध्ये प्रथ्म फलंदाजी करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेण्याची शक्यता आहे. दोन्ही संघासाठी सामना महत्त्वाचा असल्याने एक चुरशीचा खेळ आज पाहायला मिळू शकतो.


कशी आहे मैदानाची स्थिती


कटकच्या बाराबती स्टेडियममधअये आज सामना होणार असून या ठिकाणी आधी देखील भारत आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ आमने सामने आला आहे. या ठिकाणी आफ्रिकेने भारतावर 6 गडी राखून विजय मिळवला होता. दरम्यान खेळपट्टीचा विचार करता गोलंदाजांना याठिकाणी अधिक मदत मिळू शकते. विशेषत: फिरकीपटूंची गोलंदाजी अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारतीय संघाने याठिकाणी खेळलेल्या अखेरच्या टी20 सामन्यात युजवेंद्र चहलने 4 विकेट्स घेतलेले. दरम्यान या सर्वामुळे याठिकणी फलंदाजाची सत्तपरिक्षा असेल. 


कशी असू शकते भारताची अंतिम 11


ईशान किशन, ऋतुराज गायकवाड़, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार/विकेटकिपर), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंह/उमरान मलिक, रवी बिश्नोई. 


आतापर्यंत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका  


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत 16 टी-20 सामने खेळले गेले. यापैकी नऊ सामन्यात भारतानं बाजी मारली आहे. तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सात सामन्यावर ठसा उमठवता आला आहे. परंतु, भारतीय दौऱ्यावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाच पारडं जड दिसलं. भारतात दक्षिण आफ्रिकेनं आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामने जिंकले आहेत. तर, फक्त एकच सामना गमावला आहे. याआधी 2019 मध्ये पहिल्यांदाच टी-20 मालिका खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतात आला होता. त्यावेळी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. परंतु, पावसामुळं या मालिकेतील पहिला सामना रद्द झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतानं दमदार प्रदर्शना करत सामना जिंकला. तर, तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं विजय मिळवला.  आता देखील मालिकेतील पहिला सामना आफ्रिकेने जिंकत वर्चस्व घेतलं आहे.


हे देखील वाचा-