IND vs NZ, Pitch Report : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेनंतर आता भारत पुन्हा मैदानात उतरत आहे. भारतासमोर आता न्यूझीलंड (India vs New Zealand) संघाचं आव्हान असणार आहे. सामना न्यूझीलंडच्या वेलिंग्टनच्या स्काय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर आजच्या या सामन्यापूर्वी मैदानाची स्थिती अर्थात पिच रिपोर्ट (Pitch Report) कसा असेल? याबाबत जाणून घेणंही अत्यंत महत्त्वाचं आहे.
वेलिंग्टनच्या खेळपट्टीवर फलंदाजांना नेहमीच मदत मिळाली आहे, त्यामुळे शुक्रवारच्या सामन्यातही फलंदाजांना मदत मिळण्याची अपेक्षा आहे. या मैदानावर वेगवान गोलंदाजांनी फिरकीपटूंपेक्षा अधिक यश मिळवले आहे. पाऊस आणि ढग यांच्यामुळे वेगवान गोलंदाजांचे काम आणखी सोपे होऊ शकते. दोन्ही संघ किमान तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेऊ शकतात.
कसा आहे आजवरचा इतिहास?
टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) संघ यांच्यात आतापर्यंत 20 टी-20 सामने खेळवले गेले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता भारताचं पारडं काहीसं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. भारताने 20 पैकी 11 सामन्यात विजय मिळवलाय. तर, इंग्लंड संघाला 9 सामने जिंकता आले आहेत.
कसा आहे भारतीय संघ?
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
डीडी स्पोर्ट्सवर पाहता येणार सामना
भारतीय वेळेनुसार भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला टी20 सामना दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. त्यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर होणार आहे. तसेच अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.
कसं आहे टी-20 मालिकेच वेळापत्रक?
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला टी-20 सामना | 18 नोव्हेंबर | वेलिंग्टन |
दुसरा टी-20 सामना | 20 नोव्हेंबर | माउंट मॉन्गनुई |
तिसरा टी-20 सामना | 22 नोव्हेंबर | नॅपियर |
हे देखील वाचा-