Faf du Plessis: फॉफ डू प्लेसिसचे डेव्हिड वार्नर आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघावर गंभीर आरोप
Faf du Plessis On AUS vs SA 2018 Test Cricket: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसनं आपवी ऑटोबायोग्राफी 'फाफ थ्रू फायर'मधील मुलाखतीत अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली.
Faf du Plessis On AUS vs SA 2018 Test Cricket: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसनं आपली ऑटोबायोग्राफी 'फाफ थ्रू फायर'च्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर आपली प्रतिक्रिया दिली. विशेषत: दक्षिण आफ्रिकेचा संघ 2018 मध्ये कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नर आणि ऑस्ट्रेलिया संघानं दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी कशी वर्तणूक केली? यावर फाफनं भाष्य केलंय. फाफचं हे वक्तव्य सध्या क्रिकेटविश्वातील चर्चेचं कारण ठरत आहे.
ट्वीट-
Faf du Plessis has not held back speaking about Australia's cricket team.
— Stick Cricket (@stickcricket) November 17, 2022
MORE 👉 https://t.co/grCMel9rjj pic.twitter.com/YkeEv3xOKP
फाफ डू प्लेसिस काय म्हणाला?
"दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यासाठी त्यांच्या मायदेशात गेला होता. या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंकडून आम्हाला खूप वाईट वागणूक मिळाली. पण आमचा संघ घाबरला नाही. आमच्या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या संघानं शानदार खेळ करत पुनरागमन केलं."
डेव्हिड वॉर्नरवर गंभीर आरोप
दरम्यान, फाफ डू प्लेसिसनं डेव्हिड वॉर्नरवरही गंभीर आरोप केले आहेत. फाफ डुप्लेसिसनं डेव्हिड वॉर्नरवर धमकी दिल्याचा आरोप केलाय. माझ्याकडे अशा खेळाडूंसाठी वेळ नाही. विशेष म्हणजे 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान बराच वाद झाला होता. या मालिकेदरम्यान डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्टवर चेंडूशी छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा वाद सँडपेपर गेट स्कँडल म्हणून ओळखला जातो.
दक्षिण आफ्रिकेचा टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरी
नुकताच ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेल्या टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाची सुरुवात चांगली झाली. परंतु, सुपर 12 स्पर्धेतील नेदरलँड्सविरुद्ध अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं टी-20 विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं. या सामन्यातील दक्षिण आफ्रिकेचा पराभव टी-20 विश्वचषकातील मोठा उलेटफेर मानला जातोय.
हे देखील वाचा-