ENG vs IND : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं मैदान म्हणजे लंडनचं प्रसिद्ध लॉर्ड्स स्टेडियम (Lords Stadium). भारताने याच ठिकाणी 1983 साली पहिला वहिला विश्वचषक जिंकल्याने हे मैदान भारतासाठी कायमच खास राहिले आहे. त्यात आज याच मैदानात विजय मिळवल्यास भारत इंग्लंडला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय मालिकेतही मात देऊ शकतो. त आज पार पडणाऱ्या भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मैदानाची स्थिती कशी असेल, ते पाहूया...


कसा आहे पिच रिपोर्ट?


आज सामना होणाऱ्या लंडन येथील प्रसिद्ध लॉर्ड्स स्टेडियमवरील खेळपट्टीवर गवत मोठ्या प्रमाणात असून वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे. याठिकाणी चेंडूला बाऊन्स आणि सीम चांगली प्राप्त होते. पण अशातच चेंडू जुना झाल्यावर फलंदाजांनाही याठिकाणी फायदा होऊ शकतो. पण खेळपट्टी पाहता प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय़ अधिकजण घेत असल्याने आज नाणेफेकही महत्त्वाची बाब असणार आहे. 


भारताचा एकदिवसीय संघ-


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह 


पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत विजयी


इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडच्या संघाला 25.2 षटकात 110 धावांवर रोखलं. भारताकडून जसप्रीत बुमराहनं सहा आणि मोहम्मद शामीनं तीन विकेट्स घेतल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामीवीरांच्या 114 धावांच्या अभेद्य भागीदारीच्या जोरावर 18.4 षटकातच सामना जिंकला. या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराह सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 



हे देखील वाचा-