Jasprit Bumrah : भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ चांगल्या स्थितीत दिसत आहे. 416 धावा स्कोरबोर्डवर लावल्या असून 100 धावांच्या आत इंग्लंडचे महत्त्वाचे चार गडीही बाद केले आहेत. दरम्यान यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे तो कर्मधार जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah). फलंदाजीत तुफान 31 धावांची खेळी केल्यानंतर त्याने इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांनाही तंबूत धाडलं आहे. दरम्यान त्याच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर एका नव्या विश्वविक्रमाला त्याने गवसणी घातली. त्याने इंग्लंडचा गोलंदाज स्टुवर्ट ब्रॉडच्या (Stuart Broad) एका षटकात तब्बल 35 धावा ठोकल्या असून कसोटी क्रिकेटमध्ये एका षटकात झालेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असून विशेष म्हणजे तो ही खेळी करत असताना ड्रेसिंग रुममध्ये विराटपासून ते कोच द्रविडपर्यंत सर्वचजण तुफान जल्लोष करत होते, या जल्लोषाचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार उडवला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा ठोकण्याचा विक्रम बुमराहने केला.  

कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा झालेली षटकं

फलंदाज गोलंदाज धावा सामना
जसप्रीत बुमराह स्टुवर्ट ब्रॉड 35 भारत विरुद्ध इंग्लंड (2022)
ब्रायन लारा आर पीटरसन 28 वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2003)
जी बेली जेम्स अँडरसन 28 ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (2013)
केशव महाराज जो रुट 28 दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (2020)
हे देखील वाचा-