IND vs UGA : भारताच्या अंडर 19 क्रिकेट संघाने वेस्टइंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत (ICC U-19 World Cup) धमाकेदार प्रदर्शन कायम ठेवलं आहे. युगांडा विरुद्धच्या सामन्यात तर भारताने तब्बल 405 धावा स्कोरबोर्डवर लावत कमाल केली आहे. यामध्ये अंगकृष रघुवंशी (Angkrish Raghuwanshi) आणि राज बावा (Raj Bawa) यांनी अप्रतिम शतकं लगावली आहेत. याआधी भारताने अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 425 रन केले होते.


सामन्यात नाणेफेक जिंकत युगांडा संघाने गोलंदाजी घेतली. इथेच त्याच्यांकडून मोठी चूक झाली कारण भारतीय संघाने याच गोष्टीचा फायदा उचलत धमाकेदार फलंदाजी केली. हरनूर सिंग, निशांत संधू प्रत्येकी 15 धावा करुन बाद झाले. पण अंगकृष आणि राज बावा यांनी डाव सांभाळत भारताला मोठी आघाडी मिळवून दिली. यामध्ये अंगकृष याने 144 धावा केल्या. त्याने 120 चेंडूत 22 चौकार आणि चार षटकार लगावले. तर राज याने तब्बल 162 नाबाद धावा केल्या. त्याने 108 चेंडूत 14 चौकार आणि आठ षटकार ठोकले.


राजने तोडला शिखरचा रेकॉर्ड


राज याने नाबाद 162 धावा करत भारतीय फलंजाज शिखर धवनचा 17 वर्ष जुना रेकॉर्ड तोडला आहे. शिखरने 2004 मध्ये स्कॉटलँडविरुद्ध 155 धावा केल्या होत्या. अंडर 19 विश्वचषकातील ही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च धावसंख्या होती.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha