IPL 2022 Auction Date: आयपीएलचा 2021 चा हंगाम संपून काही दिवसच सरले आहेत. यातच येत्या 2022 च्या हंगामाचं बिगुल वाजलंय. नुकतीच आयपीएलमधील आठ फ्रंचायझींनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केलीय. आयपीएलच्या पुढील हंगामात अहमदाबाद आणि लखनौ हे दोन नवीन संघ मैदानात उतरणार आहे. या दोन्ही संघाला 25 डिसेंबरपूर्वी त्यांच्या तीन खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या मेगा ऑक्शनबाबत महत्वाची माहिती समोर आलीय. 


गतविजेच्या चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सनं प्रत्येकी चार खेळाडूंना रिटेन केलंय. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन केलं आहे. तर, पंजाबच्या संघानं फक्त दोनच खेळाडूंना रिटेन केलंय. माहितीनुसार, आयपीएलचं 2022 मेगा ऑक्शन डिसेंबर महिन्याच्या अखेरिस किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयनं आतापर्यंत आयपीएल ऑक्शनबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
 
आयपीएलच्या पुढील हंगामात एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद हे आयपीएलचे दोन नवीन संघ असतील. हे संघ लिलाव पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडूंना रिटेन करू शकतात. माहितीनुसार, पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यात आयपीएल 2022 च्या स्पर्धेला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. तसेच आयपीएलचा पुढील हंगाम भारतातच खेळला जाईल, असं बीसीसीआयनं स्पष्ट केलंय.


हे देखील वाचा- 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha