Arshdeep Singh in Team India : डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) याने आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर थेट भारतीय संघाचं तिकीट मिळालं आहे. आता आगामी टी20 विश्वचषकासाठी (T20 World Cup) देखील अर्शदीपला संघात जागा मिळाली आहे. डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट म्हणून त्याला भूमिका दिली असून पाकिस्तानचा माजी क्रिकेटर कामरान अकमलने (Kamran Akmal) अर्शदीपची तुलना माजी दिग्गज भारतीय क्रिकेटर झहीर खानशी (Zaheer Khan) केली आहे. अर्शदीप भारताचा दुसरा झहीर खान असल्याचं त्यानं म्हटलं आहे.


काय म्हणाला कामरान?


कामरान त्याच्या यूट्यूब चॅनलवर अर्शदीपचे कौतुक करताना म्हणाला, ''अर्शदीप सिंह हा उत्कृष्ट गोलंदाज आहे. माझ्या मते भारतीय संघाला आणखी एक झहीर खान मिळाला आहे. त्‍याच्‍याकडे वेगवान आणि स्विंग अशा दोन्हीप्रकारे बोलिंग करण्याची कला आहे.'' कामरान पुढे बोलताना म्हणाला, 'दक्षिण आफ्रिकेलविरुद्ध त्याने दमदार गोलंजाजी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेचे सुरुवातीचे तीन चांगले फलंदाज बाद केले, यावेळी त्याने चांगल्या रणनीतीने गोलंदाजी केली. तो तरुण असून त्याच्याकडे वेगही आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी ही एक चांगली गोष्ट आहे की त्यांना एक चांहवा डावखुरा गोलंदाज मिळाला आहे.


देशांतर्गत क्रिकेटमध्ये अर्शदीपची कामगिरी


सर्वात आधी अर्शदीप नावारुपाला आला तो आयपीएलमधून. आयपीएल 2022 मध्ये त्याने कामगिरी केल्यानंतर अर्शदीपला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे अर्शदीपने आपल्या कामगिरीने सिलेक्टर्सचा विश्वास खरा ठरवला. त्याने आतापर्यंत जवळपास प्रत्येक मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. 23 वर्षीय अर्शदीपने आतापर्यंत 12 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने 18.47 च्या गोलंदाजी सरासरीने 17 विकेट्स घेतले आहेत.  यादरम्यान अर्शदीपचा इकॉनॉमी रेटही 8 पेक्षा कमी होता. 


अर्शदीपची आयपीएलमधील कामगिरी


अर्शदीप सिंहनं आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 35 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 8.39 च्या इकॉनॉमीने 37 विकेट्स घेतल्या आहे. आयपीएलमध्ये एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही त्यानं केला आहे. 




हे देखील वाचा-