BCCI on World Cup 2023 : सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळवला जात आहे. यानंतर 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळवला जाणार असून या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी बीसीसीआयला मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यात विश्वचषकासाठी केंद्र सरकारने करात सूट दिली नाही तर बीसीसीआयला जवळपास 950 कोटींचे नुकसान सहन करावे लागू शकते.


या करसंबंधित प्रकरणासाठी, बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि नवनिर्वाचित खजिनदार आशिष शेलार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतील आणि या विषयावर चर्चा करतील, अशी माहितीही समोर आली आहे. केंद्र सरकारने करात सवलत न दिल्यास बीसीसीआयला मोठा म्हणजेच जवळपास 950 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागू शकतो. 2014 मध्ये, बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात 2016 टी-20 विश्वचषक, 2018 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 विश्वचषक या तीन स्पर्धांसाठी करात सूट देण्याबाबत चर्चा झाली होती, पण आता भारत सरकारने सूट न दिल्यास बीसीसीआयला तोट सहन करावा लागू शकतो. 2023 मध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषकात भारतीय संघाकडून विजयाच्या अधिक अपेक्षा फॅन्सना असतील. 2019 चं यजमानपद भूषवणाऱ्या इंग्लंडने मागच्या वेळी जशी ट्रॉफी जिंकली होती, तशीच यावेळीही टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असेल. 2019 च्या विश्वचषकात टीम इंडिया सेमीफायनलमधून बाहेर पडली होती.


रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष


बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याकडून पदाची सुत्रे हाती घेतले. तसेच रॉजर बिन्नी हे बीसीसीआयचे 36वे अध्यक्ष ठरले आहेत.  रॉजर बिन्नी यांच्याकडंच बीसीसीआयच्या अध्यक्षपदांची जबाबदारी सोपवली जाणार असल्याचं जवळपास निश्चित होतं. केवळ औपचारिकता म्हणून बीसीसीआय अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली.


महिला आयपीएलबाबत मोठी घोषणा


मुंबईत (Mumbai) आज बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, ज्यात महिला आयपीएलचाही (Women’s IPL) समावेश आहे. पुरूषांप्रमाणे पुढच्या वर्षी महिला आयपीएलचंही आयोजन केलं जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. महिला आयपीएलध्ये सुरुवात पाच संघ सहभागी होतील. परंतु, महिला आयपीएलचं ऑक्शन कसं होईल? याबाबत मंगळवारी निर्णय घेतला जाऊ शकतो. 


हे देखील वाचा -


Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची जबरदस्त खेळी! सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ठोकलं दुसरं शतक, कोहली-शर्मालाही टाकलं मागे