Pro Kabaddi League 2022: प्रो कबड्डी लीगच्या नवव्या हंगामातील 26व्या सामन्यात बंगाल वॉरिअर्स आणि जयपूर पिंक पँथर्स (Bengal Warriors vs Jaipur Pink Panthers) यांच्यात आज लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांनी आपपल्या मागील तिन्ही सामन्यात विजय मिळवलाय. या स्पर्धेत तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दोन्ही संघ एकमेकांसमोर येणार असल्यानं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.


गिरीश आणि मनिंदर यांच्यावर महत्वाची जबाबदारी
बंगालचा डिफेंडर गिरीश एर्नाक जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या हंगामात सर्वाधिक टॅकल पॉईंट घेणारा तो खेळाडू आहे. तसेच त्यानं या हंगामात सर्वाधिक दोन हाय फाईव्हही ठोकले आहेत. या सामन्यातही एर्नाककडून चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहे. बंगालचा कर्णधार मनिंदर सिंहनं चार सामन्यांत 41 रेड पॉइंट घेतले आहेत. मनिंदरनं आतापर्यंत तीन सुपर 10 घेतले आहेत असून या सामन्यातही चांगली कामगिरी करण्यासाठी तो मैदानात उतरेल. या हंगामात दीपक हुडानं चांगली सुरुवात केली. परंतु, मागच्या काही सामन्यात त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. या सामन्यातून कमबॅक करण्याचा त्याचा प्रयत्न असेल.


संपूर्ण जयपूरचं अर्जून आणि राहुल यांच्या कामगिरीवर लक्ष
अर्जून देशवाल सातत्यानं जयपूरच्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसतोय. जयपूरचा मागचा सामना वगळला तर, त्यानं आतापर्यंतच्या सर्व सामन्यात चांगलं प्रदर्शन केलं आहे. राहुल चौधरीनंही मागच्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केलीय. आपला फॉर्म कायम ठेवण्यासाठी राहुल आजही मैदानात उतरेल.


कधी, कुठं पाहणार सामना?
बंगाल वॉरियर्स आणि जयपूर पिक पँथर्स यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. हा सामना बंगळुरुच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर हा सामना लाईव्ह दाखवला जाणार आहे. तर, डिज्नी हॉटस्टार अॅपवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे.


संघ-


बंगाल वॉरियर्स संघ:
श्रीकांत जाधव, अस्लम साजा, मोहम्मद थंबी, मनिंदर सिंह, आर गुहान, सुयोग बबन गायकर, प्रशांत कुमार, आकाश पिकलमुंडे, गिरीश एरनाक, अमित शेओरान, परवीन सतपाल, शुभम शिंदे, सोलेमान पहेलवानी, सुरेंदर नाडा, साकवी, आर. वैभव भाऊसाहेब गर्जे, दीपक निवास हुडा, अजिंक्य रोहिदास कापरे, रोहित, आशिष कुमार (सांगवान), बालाजी डी, विनोद कुमार, मनोज गौडा के.


जयपूर पिंक पँथर्स संघ: 
अजित व्ही कुमार, अर्जुन देशवाल, देवांक, राहुल चौधरी, नितीन पनवार, नवनीत, भवानी राजपूत, सुनील कुमार, अभिषेक केएस, आशिष, अंकुश, साहुल कुमार, दीपक, वूसन को, लकी शर्मा, रजा मीरबाघेरी, नितीन चंदेल, राहुल गोरख धनावडे.


हे  देखील वाचा-