Jhulan Goswami: भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीनं न्यूझीलंड येथे सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात आणखी एका विक्रमाला गवसणी घातलीय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शनिवारी खेळण्यात आलेल्या सामन्यात झुलन गोस्वामी तिच्या कारकिर्दीतील 200 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 सामने खेळणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या यादीत भारताची कर्णधार मिताली राज अव्वल स्थानी आहे. तिनं आतापर्यंत 229 एकदिवसीयआंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.


आयसीसी महिला विश्वचषकात यापूर्वी झुलन गोस्वामीनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 घेण्याचा विक्रम रचला होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेणारी ती पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. कोणत्याही महिला क्रिकेटपटूला आतापर्यंत  200 विकेट्स टप्पाही गाठता आलेला नाही. झुलन गोस्वामी आपल्या कारकिर्दीतील अखेरचा विश्वचषक खेळणार आहे.


झुलन गोस्वामीची कारकीर्द
झुलननं 6 जानेवारी 2002 रोजी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ती भारतीय महिला संघाकडून खेळत आहे. 20 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिनं 350 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिने एकदिवसीय सामन्यात 250 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिनं कसोटी क्रिकेटमध्ये 44 आणि टी-20 मध्ये 56 विकेट्स घेतल्या आहेत.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात भारताचा पराभव
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागलाय. भारतानं दिलेलं 278 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं सहा गडी आणि 3 चेंडू राखत पार केलं. या विजयासह विश्वचषक चषकाचा मुख्य दावेदार असलेल्या ऑस्ट्रेलियानं आघाडीच्या चार संघात स्थान निश्चित केलंय. 


हे देखील वाचा-




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha