IND W vs AUS W World Cup : महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारतीय महिला संघाचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी आणि तीन चेंडू राखून पराभव केला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मेग लेनिंगने 97 धावांची दमदार खेळी केली. तसेच तिला अलिसा हिलीने देखील चांगली साथ दिली. हिली 72 धावांवर बाद झाली.
दरम्यान, भारताने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 278 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने दमदार सुरुवात केली होती. सात गड्यांच्या मोबदल्यात भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियासमोर 278 धांवाचे लक्ष्य ठेवले आहे. या 277 धावांमध्ये यस्तिका भाटिया, मिथाली राज आणि हरमनप्रीत कौर या तिघींनी अर्धशतकी खेळी केली आहे. एका क्षणी भारतीय संघाने 6 षटकांत केवळ 28 धावांत शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर मिताली राज आणि यस्तिका भाटिया यांनी तिसऱ्या विकेटसाठी 25.4 षटकांत 130 धावांची भागीदारी केली. मिताली राजने 96 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 68 धावा केल्या. यास्तिका भाटियाने 83 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने 278 धांवाचे लक्ष्य ठेवले आहेत. हे लक्ष्य ऑस्ट्रेलियाच्या संघाने तीन विकेटच्या मोबदल्यात एक षटक राखून विजय मिळवला.
आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी एवढी चांगली राहिली नाही. आता या पराभवनानंतर भारताच्या खात्यावर दोन विजय आणि तीन पराभव जमा झाले आहेत. या सामन्यात भारतीय महिला संघाचा विजय होईल असी अपेक्षा होती. मात्र, शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाचा अखेर विजय झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने भारताचा सहा गडी आणि तीन चेंडू राखून पराभव केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: