ICC Women’s T20I Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं (ICC) आज महिला टी-20 क्रमवारीका जाहीर केलीय.आयसीसीनं जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंहनं (Renuka Singh) मोठा फायदा झालाय. आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीत रेणुका सिंहनं पाच स्थानांनी झेप घेतलीय. ज्यामुळं ती 13 व्या स्थानावर पोहचलीय. तर, फिरकीपटू दीप्ती शर्मानं सातवं स्थान कायम राखलंय. चेस्टर ली स्ट्रीट येथे गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध 9 विकेट्सं पराभव स्वीकाराला लागला. पण या सामन्यात रेणुकानं दमदार गोलंदाजी केली. ज्याचा फायदा तिला आयसीसी क्रमवारीत झाला. रेणुकाचे 612 रेटिंग गुण आहेत. दीप्ती शर्मा ही आयसीसी गोलंदाजांच्या क्रमवारीच्या टॉप-10 मध्ये एकमेव भारतीय आहे. तर, ती अष्टपैलूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.


स्मृती मानधना चौथ्या क्रमांकावर


भारताची विकेटकिपर फलंदाज रिचा घोषनं चार स्थानांनी झेप घेऊन 75 व्या स्थानावर पोहचलीय. फलंदाजांच्या क्रमवारीत भारताची सलामीवीर स्मृति मानधना 710 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तर, शेफाली वर्मा 686 गुणांसह सहा आणि जेमिमा रोड्रिग्ज 624 गुणांसह दहाव्या क्रमांकावर आहे.  


इंग्लंडच्या खेळाडूंनाही तगडा फायदा


भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शानदार कामगिरी केल्यानंतर इंग्लंडची अष्टपैलू खेळाडू सारा ग्लेन ही इंग्लंडचीच सोफी एक्लेस्टोन हिच्या जवळ पोहोचली आहे. सारा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून ही तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग आहे. ती सोफीपेक्षा फक्त 13 गुणांनी मागे आहे.


सोफिया डंकले आणि अॅलिस कॅप्सी या इंग्लंडच्या फलंदाजांच्या क्रमवारीतही पहिल्या सामन्यानंतर सुधारणा झाली आहे. सोफियाने 44 चेंडूत नाबाद 61 धावा केल्याने 13 स्थानांनी झेप घेत 44व्या स्थानावर पोहोचली आहे, तर एलिसने 20 चेंडूत नाबाद 32 धावा केल्याने 12 स्थानांनी पुढे जात ती 52व्या स्थानावर आहे. फ्रेया डेव्हिसला नऊ स्थानांचा फायदा झाला असून ती गोलंदाजांच्या यादीत 59व्या स्थानावर पोहोचली आहे.


हे देखील वाचा-