Jaswant Bakrania Passes Away: माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज जसवंत बक्रानिया यांचं आज (मंगळवारी, 13 सप्टेंबर) बंगळुरू येथे निधन झालंय. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. गुजरात क्रिकेट असोसिएशननं ट्विटरच्या माध्यमातून जसवंत बक्रानिया यांच्या निधनाची बातमी दिलीय. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सौराष्ट्र आणि गुजरात संघाकडून क्रिकेट खेळले होते. त्यांच्या निधनानं क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसलाय.
ट्वीट-
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून दु:ख व्यक्त
बक्रानिया यांच्या निधनानंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशननं दु:ख व्यक्त करताना लिहिलंय की,"जसवंतभाईंच्या दुःखद निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येकाकडून त्यांचे भाऊ अश्विन बक्रानिया आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाला सांत्वना. जसवंतभाईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना”
जसवंत बक्रानियाची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
बक्रोनिया यांचा जन्म पूर्ण आफ्रिकेच्या झिंझा शहरात झाला होता. मात्र, काही काळानंतर बक्रोनिया यांचं कुटुंब राजकोटला स्थानिक झालं. त्यानंतर बक्रानिया यांनी 1970 ते 1983 दरम्यान सौराष्ट्र आणि राजकोट संघांकडून क्रिकेट खेळलं. या दोन्ही संघात त्यांनी यष्टीरक्षक फलंदाजांची भूमिका बजावली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 56 अ श्रेणी क्रिकेट सामन्यात 32. 34 च्या सरासरीनं 3 हजार 137 धावा केल्या. या दरम्यान त्यांच्या बॅटमधून पाच शतक झळकली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये बक्रोनियानं 51 झेल आणि 12 फलंदाजांना यष्टीचीत केलं आहे.
क्रिकेटच्या विकासात महत्त्वाची भूमिका
बक्रोनिया यांनी अ दर्जाच्या क्रिकेटमधील 11 सामन्यांमध्ये त्यांनी 264 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. महत्वाचं म्हणजे, क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतही त्यांनी क्रिकेटच्या विकास करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली. तसेच आयएसएससीओसाठी करत क्रिकेटला पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा-