क्रिकेट विश्वात खळबळ! WTC मध्ये होणार मोठा बदल, IND विरुद्ध ENG मालिकेपूर्वी ICC उचलणार मोठे पाऊल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे.

ICC to Introduce Two-Tier System in World Test Championship : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप म्हणजेच WTC ही कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली. आतापर्यंत त्याच्या 2 आवृत्त्या खेळल्या गेल्या आहेत. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी एकदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा अंतिम सामना खेळला जाणार आहे, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल. या अंतिम सामन्यासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचे सध्याचे स्वरूप संपुष्टात येईल, त्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये द्विस्तरीय प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अधिक रोमांचक आणण्यासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) चे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) चे अध्यक्ष जय शाह यांच्याशी चर्चा केली. इंग्लंड 20 जूनपासून हेडिंग्ले येथे भारताचे यजमानपद भूषवणार आहे, पुढील मालिका फक्त पाच महिन्यांवर आहे.
या नियमानुसार, सर्व संघांना दोन गटात विभागले जाईल जेणेकरून वरच्या संघांमध्ये जास्तीत जास्त सामने खेळता येतील आणि खालच्या संघांमध्ये स्पर्धा होईल.
थॉम्पसन यांनी टेलिग्राफ स्पोर्टला सांगितले की, सध्याची रचना जशी असायला हवी तशी काम करत नाही, हे पूर्णपणे समजले आहे आणि आपल्याला आता स्पर्धसाठी नवीन काही गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावर काम करण्यासाठी पाच महिने आहेत आणि भविष्यातील रचना कशी असावी ते पाहू. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ही स्पर्धा अधिक निष्पक्ष आणि स्पर्धात्मक असायला हवी. सर्वोत्तम संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन मिळावे आणि कसोटी क्रिकेट खेळू इच्छिणाऱ्या इतर देशांना कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे यासाठी हा बदल केला जात आहे.
क्रीडा स्पर्धांच्या सध्याच्या स्वरूपावर त्याच्या कमतरतांबद्दल टीका झाली आहे. दोन वर्षांच्या चक्रात संघ सर्व प्रतिस्पर्ध्यांशी खेळत नाहीत आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिका देखील आहेत, ज्यामुळे गुणतालिकेत सातत्य नसते. राजकीय अडथळ्यांमुळे भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळत नाहीत. त्याचप्रमाणे, दक्षिण आफ्रिकेने सध्याच्या चक्रात ऑस्ट्रेलियाविरुद्ध न खेळता अंतिम फेरी गाठली. पण, हे दोन्ही संघ जूनमध्ये लॉर्ड्स येथे होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यात एकमेकांसमोर येतील.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
