ICC Womens World Cup 2022 : भारतीय महिला क्रिकेट टीम (Indian Women Cricket Team) ची वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामी (Jhulan Goswami 250 ODI Wickets) ने आयसीसी वर्ल्ड कप 2022 (ICC Womens World Cup 2022) मध्ये इतिहास रचला आहे. झुलननं बुधवारी इंग्लंड (INDW vs ENGW World Cup) विरुद्धचा आपला पहिला विकेट घेतला आणि इतिहास रचला. झुलन वनडे क्रिकेटमध्ये 250 विकेट्स घेणारी पहिली महिला क्रिकेटर बनली आहे. तसेच, हा तिचा 350वा आंतरराष्ट्रीय विकेटही आहे.
भारतीय संघाच्या 135 धावांच्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाची सुरुवात खराब झाली. डॅनियल वेटच्या रूपानं इंग्लंडला पहिला धक्का बसला. तिला मेघना सिंहनं स्नेह राणाच्या हातून बाद केलं. यानंतर झुलन गोस्वामीने जेमी ब्युमॉंटला एलबीडब्ल्यू (LBW) करत वनडे क्रिकेटमध्ये आपला 250वा विकेट घेतला.
विश्वचषकातही सर्वाधिक विकेट्स
महिला विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माजी खेळाडू लिन फुलस्टनच्या नावावर होता. लिननं 1982 ते 1988 दरम्यान विश्वचषकात 39 विकेट घेतल्या होत्या. झुलननं यंदाच्या विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विश्वचषकातील 39वा विकेट घेतला.
भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव
महिला वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज इंग्लंडच्या महिला संघाने पराभव केला आहे. भारताचा हा वर्ल्ड कप स्पर्धेतील चौथा सामना होता. या सामन्यात भारताचा 4 गडी राखून पराभव झाला आहे. प्रथम फलदांजी करताना भारतीय महिला संघ 134 धावांवर ऑल आऊट झाला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यास आलेल्या इंग्लंडच्या महिला संघाने केवळ 31 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 136 धावा करुन विजय मिळवला.
दरम्यान, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघासमोर 134 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय संघ 36 षटकातच ऑल आऊट झाला होता. भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली होती. त्यानंतर भारतीय संघाला आपला डाव सावरता आला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Womens World Cup 2022 : भारतीय महिला संघाचा इंग्लंडकडून पराभव, 31 षटकातच पूर्ण केलं लक्ष्य