ICC Team India Players Rankings : आयसीसीने कसोटी, टी20 आणि वनडे क्रमवारी जारी केली आहे. कसोटी क्रमवारीत फलंदाजीत न्यूझीलंडचा केन विल्यमसन पहिल्या क्रमांकावर आहे. तर गोलंदाजीत अश्विन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. एकदिवसीय मध्ये पाकिस्तानचा बाबर आझम पहिल्या स्थानावर विराजमान आहे तर गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाचा जोश हेजलवूड अव्वल स्थानावर आहे. टी 20 मध्ये भारताचा सूर्यकुमार यादव पहिल्या स्थानावर तर गोलंदाजी राशिद खान आघाडीवर आहे. संघाचा विचार केल्यास टी20 आणि कसोटीमध्ये भारताचा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ आघाडीवर आहे. 


टी20मध्ये भारतीय खेळाडूंची काय स्थिती ?


फलंदाजीत सूर्यकुमार यादव टी 20 मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर विराट कोहली 14 व्या स्थानावर आहे. लोकेश राहुल 31, रोहित शर्मा 33, शुभमन गिल 34,  इशान किशन 51, हार्दिक पांड्या 55 व्या स्थानावर आहे. टी20 मध्ये गोलंदाजीत अव्वल दहामध्ये एकही भारतीय गोलंदाज नाही. 14 व्या क्रमांकावर अर्शदीप सिंह विराजमान आहे.  भुवनेश्वर कुमार 18 व्या स्थानावर आहे. अश्विन 27 तर अक्षर पटेल 28 व्या स्थानावर आहे. युजवेंद्र चहल 34, हार्दिक पांड्या 43 आणि हर्षल पटेल 62 व्या स्थानावर आहे.  जसप्रीत बुमराह 84 व्या स्थानावर आहे.  अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. हार्दिकचा अपवाद वगळता आघाडीच्या 20 अष्टपैलू खेळाडूमध्ये एकही भारतीय नाही. 


वनडेमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी काय?


एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजात शुभमन गिल पाचव्या स्थानावर आहे. तर विराट कोहली आठव्या स्थानावर आहे. आघाडीच्या दहा फलंदाजामध्ये भारताचे तीन खेळाडू आहे. रोहित शर्मा दहाव्या स्थानावर आहे. श्रेयस अय्यर 24 व्या स्थानावर आहे. शिखर धवन 37, लोकेश राहुल 41, ईशान किशन 60, हार्दिक पांड्या 75 यांचा समावेश आहे. गोलंदाजीचा विचार केल्यास मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुलदीप यादव 23 व्या स्थानावर आहे. जसप्रीत बुमराह 27, मोहम्मद शमी 32, शार्दुल ठाकूर 43, युजवेंद्र चहल 44, हार्दिक पांड्या 78 आणि रविंद्र जाडेजा 80 व्या स्थानावर आहे. वनडे क्रमवारीत अष्टपैलूमध्ये आघाडीच्या दहा खेळाडूमध्ये एकाही भारतीय खेळाडू आहे.  हार्दिक पांड्या 12 व्या स्थानावर विराजमान आहे. आघाडीच्या 20 अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक पांड्याचा अपवाद वगळता एकही खेळाडू नाही. 


कसोटीत भारतीय खेळाडूंची स्थिती काय ?


कसोटीमध्ये भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. पण आघाडीच्या दहा फलंदाजामध्ये फक्त ऋषभ पंत हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. ऋषभ पंत दहाव्या स्थानावर आहे. रोहित शर्मा 13 आणि विराट कोहली 14 व्या स्थानावर आहे. चेतेश्वर पुजारा 26, अजिंक्य रहाणे 35, श्रेयस अय्यर 36, रविंद्र जाडेजा 42, अक्षर पटेल 47, शुभमन गिल 51, लोकेश राहुल 61, हनुमा विहारी 62 आणि आर. अश्विन 75 व्या क्रमांकावर आहे. शार्दुल ठाकूर 100 व्या स्थानावर आहे. कसोटी गोलंदाजीच्या क्रमवारीत आर. अश्विन पहिल्या स्थानावर विराजमान आहे. अश्विनशिवाय बुमराह आणि जाडेजा आघाडीच्या दहा गोलंदाजामध्ये आहेत. जसप्रीत बुमराह नवव्या तर रविंद्र जाडेजा दहाव्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी 20, अक्षर पटेल 32, उमेश यादव 35, मोहम्मद सिराज 40,  कुलदीप यादव 49, शार्दुल ठाकूर 52 क्रमांकावर आहेत. अष्टपैलू खेळाडूच्या क्रमवारीमध्ये भारताचा दबदबा आहे. रविंद्र जाडेजा पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर आर. अश्विन दुसऱ्या आणि अक्षर पटेल पाचव्या स्थानावर आहे.