ICC T20I Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीनं (ICC) नुकतीच टी-20 संघाची क्रमावारीका (ICC T20I Team Rankings) जाहीर केलीय. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार, भारतीय संघाला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) नुकतीच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 2-1 असा विजय मिळवला. ज्यामुळं भारतानं आयसीसीच्या संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडपेक्षा सात गुणांची आघाडी घेतलीय. 


ट्वीट-




 


भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका जिंकली
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं जोरदार कमबॅक करत नागपूर येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यानतंर अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव करत मालिका जिंकली. 


आफ्रिकेला दुसऱ्या स्थानावर पोहचण्याची संधी
आयसीसी टी-20 संघाच्या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी असून त्यांचे 268 गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या संघाचे 161 गुण आहेत. तर, 258 गुणांसह दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताला येत्या 28 सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्याची आहे. या मालिकेद्वारे दक्षिण आफ्रिकेचा संघाकडं त्यांच्या क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे. 


ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या स्थानावर
कराचीतील चौथ्या टी-20 सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचा पराभव करून भारताला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तानला इंग्लंडविरुद्ध अजून तीन सामने खेळायचे आहेत आणि ते त्यांच्या क्रमवारीत सुधारणा करू शकतात. उर्वरित तीन सामन्यांपैकी कोणताही सामना जिंकल्यास इंग्लंड दुसऱ्या स्थानावर येईल. विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियाची सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे.


हे देखील वाचा-