INDvsENG 2nd Test : लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी मात केली आहे. मोहम्मद शमी, केएल राहुल, मोहम्मद सिराज यांची खेळी निर्णायक ठरली. भारताने दिलेल्या 271 धावांना पाठलाग करण्यासाठी मैदानात उतलेला इंग्लंडचा संघ अवघ्या 120 धावाच करु शकला. इंग्लंडचे पाच खेळाडू शुन्यावर बाद झाले. कर्णधार जो रुटने इंग्लंडकडून सर्वाधिक 33 तर जो बटलरने 25 धावांची खेळी केली.  भारताकडून मोहम्मद सिराजने 4, इशांतने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या. 


भारताचा दुसरा डाव


पाचव्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऋषभ पंत 22 धावा करुन बाद झाला. त्यानंतर इशांत शर्मा 16 धावांवर आणि रवींद्र जाडेजा 3 धावांवर बाद झाला. त्यानंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोघांना नाबाद अर्धशतकी भागीदारी केली. मोहम्मद शमीने नाबाद 56 धावांवर तर जसप्रीत बुमराहने नाबाद 34 धावा केल्या.   


दुसऱ्या डावात भारताकडून अजिंक्य रहाणेने 61, रोहित शर्माने 21, चेतेश्वर पुजाराने 45, विराट कोहलीने 20, ऋषभ पंतने 22 धावा केल्या. तर इंग्लंडकडून मार्क वूडने 3,  ऑली रॉबिन्सनने 2 आणि मोईन अलीने 2 तर सॅम करनने एक विकेट घेतली. 


इंग्लंडचा पहिला डाव


त्याआधी इंग्लंडने पहिल्या डावात 391 धावा करत 27 धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये कर्णधार जो रूटने 180 धावांची नाबाद खेळी केली. रूटने आपल्या खेळीत 18 चौकार ठोकले. त्याच्याव्यतिरिक्त जॉनी बेअरस्टोने 7 चौकारांसह 57 तर रोरी बर्न्सने 49 धावांची खेळी केली. जोस बटलरने 23 तर मोईन अलीने 27 धावांची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 3 तर मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या. 


भारताचा पहिला डाव


भारताकडून पहिल्या डावात केएल राहुलने धडाकेबाज शतक साजरं केले. राहुलने 129 धावांची खेळी केली. यासह भारताने पहिल्या डावात 364 धावा केल्या. रोहित शर्माने 83, कर्णधार विराट कोहलीनेही 42 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंतने 37, रवींद्र जाडेजाने 40 धावा केल्या. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने 5 विकेट घेतल्या. तर रॉबिन्सनने 2 आणि मोईन अलीने एक विकेट घेतली.