ICC T20 WC 2021, WI Vs SL: टी-20 विश्वचषकातील 35 व्या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं वेस्ट इंडीजला 20 धावांनी पराभूत केलंय. शेख जायद स्डेडिअमवर खेळण्यात आलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, श्रीलंकेच्या संघाने 20 षटकात 3 विकेट्स गमावून वेस्ट इंडीजच्या संघासमोर 190 धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग करीत असताना वेस्ट इंडीजच्या संघाला 169 धावांपर्यंत मजल मारता आली.


ऑक्टोबरमध्ये ICC Player of The Month कोण असेल? या तीन खेळाडूंना पुरुष क्रिकेटपटूंमध्ये नामांकन


नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाकडून पथुम निसांका (41 बॉल 51), कुसल परेरा (21 बॉल 29 धावा), चारिथ असलंका (41 बॉल 68 धावा), अविष्का फर्नांडो(14 बॉल 25, नाबाद) आणि चमिका करुणारत्ने नाबाद 3 धावा केल्या. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघाला 20 षटकात 3 विकेट्स गमावून 189 धावापर्यंत मजल मारता आली. वेस्ट इंडीजच्या संघाकडून आंद्रे रसलला 2 विकेट्स तर, ड्वेन ब्राव्होला एक विकेट्स मिळाली. 


Sooryavanshi: सूर्यवंशी चित्रपटातून महेंद्रसिंह धोनीचे चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण? गुलशन ग्रोव्हरकडून फोटो पोस्ट


वेस्ट इंडीजच्या संघाकडून ख्रिस गेल (5 बॉल 1 धाव), एविन लुईस (6 बॉल 8 धावा), रोस्टन चेस (8 बॉल 9 धावा), निकोलस पूरन (34 बॉल 46 धावा), किरॉन पोलार्ड (1 बॉल 0 धाव), शिमरॉन हेटमायर (54 बॉल 81), आंद्रे रसेल (4 बॉल 2 धावा), ड्वेन ब्राव्हो (3 बॉल 2 धावा), जेसन होल्डर (5 बॉल 8), अकेल होसेन (1 बॉल 1 धाव) आणि  रवी रामपॉल नाबाद 1 धाव केली. ज्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून 169 धावा करता आल्या. श्रीलंकेकडून बिनुरा फर्नांडो, चमिका करुणारत्ने आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स प्राप्त केल्या. तर, दासुन शनाका आणि दुष्मंथा चमीरा यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली.


या सामन्यात वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु, वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर ख्रिस गेलने अविष्का फर्नांडोच्या हाती झेल दिला. या सामन्यात ख्रिस गेलने 5 बॉल खेळून केवळ एक धाव केली.