IND vs NAM T20 World Cup 2021 Live Updates: भारताचा नामिबीयावर 9 विकेट्स राखून विजय
ICC T20 WC 2021: उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर झालेला भारतीय संघ या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. भारत- नामिबिया सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स www.abplive.com वर मिळवता येतील.
टी-20 विश्वचषकाच्या 42 सामन्यात भारतीय संघानं नामिबिया संघाला धूळ चाखली. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर नामिबियाच्या संघ डगमगताना दिसला. नामिबियाने या सामन्यात 20 षटकात 8 विकेट्स गमावून 132 धावा केल्या. नामिबियाच्या संघाने दिलेलं भारतानं 1 विकेट्स गमावून 15.2 व्या षटकातच पूर्ण केलं.
नामिबियाविरुद्ध सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली. ज्यामुळे नामिबियाच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 132 धावांपर्यंत मजल मारता आलीय.
नामिबियाविरुद्ध सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी केली. ज्यामुळे नामिबियाच्या संघाला 20 षटकात 8 विकेट्स गमावून केवळ 132 धावांपर्यंत मजल मारता आलीय.
रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर लॉफ्टी-ईटन बाद झालाय. नामिबियाचा स्कोर- 49/4 (9.2)
नामिबियाच्या संघाला दुसऱ्या झटका बसलाय. भारताचा फिरकीपटू रविंद्र जाडेजानं क्रेग विल्यम्सला बाद केलंय. नामिबियाचा स्कोर- 34/2 (6)
नामिबिया विरुद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर खेळल्या जाणाऱ्या 42 व्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
पार्श्वभूमी
IND vs NAM T20 World Cup 2021 Live Updates: टी-20 विश्वचषकाच्या 42 व्या सामन्यात भारतीय संघ आज नामिबियाशी (India vs Nambia) भिडणार आहे. भारतीय संघ दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर (Dubai International Stadium) विश्वचषकातील अखेरचा सामना खेळणार आहे. हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे. दरम्यान, उपांत्य फेरीत पोहोचण्याची संधी न मिळाल्यानंतर निराश झालेलं भारतीय खेळाडू या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. भारत- नामिबिया सामन्याशी संबंधित सर्व अपडेट्स www.abplive.com वर मिळवता येतील.
भारत- नामिबिया सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या हिंदी आणि इंग्रजी चॅनेलवर केलं जाणार आहे. स्टार स्पोर्ट्स वन, स्टार स्पोर्ट्स वन एचडी, स्टार स्पोर्ट्स 3, स्टार स्पोर्ट्स 3 एचडी वर हा सामना लाईव्ह पाहता येईल. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवरही या सामन्याचे थेट प्रक्षेपण केलं जाईल. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर केलं जाईल.
भारतीय संघ-
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, इशान किशन, राहुल चहर
नामिबियाचा संघ-
स्टीफन बार्ड, मायकेल व्हॅन लिंजेन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), झेन ग्रीन (विकेटकिपर), डेव्हिड विसे, जेजे स्मित, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, क्रेग विल्यम्स, रुबेन ट्रम्पेलमन, कार्ल बिर्केनस्टॉक, बर्नार्ड शॉल्ट्ज, पिक्की या फ्रान्स, जॅन फ्रायलिंक, मिचाऊ डु प्रीझ, बेन शिकोंगो
टी-20 विश्वचषकात भारताची अतिशय खराब सुरुवात झाली. या स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुढील सामन्यात भारताने अफगाणिस्तान आणि स्कॉटलँड विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवून उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा वाढवल्या. मात्र, न्यूझीलंडच्या संघाने काल अफगाणिस्तानला पराभूत करून संपूर्ण समीकरण बदलून टाकलं. न्यूझीलंडच्या विजयामुळे भारत उपांत्य फेरीसाठी अपात्र ठरलाय. भारत आज नामिबियाशी खेळणार असून हा सामना फक्त औपचारिकता असणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -