सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा (Australia Vs Sri Lanka) 7 विकेट्स राखून पराभव केला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 6 विकेट्स गमावून 154 धावा केल्या. प्रत्युत्तरात 155 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 17 षटकांत 3 विकेट्स गमावून 155 धावा केल्या. या सामन्यात 12 धावा देऊन 2 विकेट्स पटकणारा अॅडम झम्पा सामनावीर ठरला. 


या सामन्यात नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघाकडून कुसल परेरा (25 बॉल 35 धावा), पथुम निसांका (9 बॉल 7 धावा), चरित असलंका (27 बॉल 35), अविष्का फर्नांडो (7 बॉल 4 धावा), वानिंदू हसरंगा (2 बॉल 4 धावा), भानुका राजपक्षे (26 बॉल 33), दासुन शनाका (19 बॉल 12 धावा) आणि चमिका करुणारत्ने 6 बॉलमध्ये 9 धावा केल्या. ज्यामुळे श्रीलंकेच्या संघाला 20 षटकात 154 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स पटकावली. 


श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. डेव्हिड वार्नरने जबरदस्त खेळी करीत 42 बॉलमध्ये 65 धावा ठोकल्या. तर, आरोन फिंचनेही 23 बॉलमध्ये 37 धावा केल्या. त्यानंतर मैदानात आलेल्या ग्लेन मॅक्सवेल (6 बॉल 5 धावा), स्टीव्ह स्मिथ नाबाद (26 बॉल 28 धावा) आणि मार्कस स्टॉयनिसने नाबाद 7 बॉलमध्ये 16 धावा केल्या. ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 17 व्या षटकातच श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. 


महत्वाचे म्हणजे, डेव्हिड वार्नरचा फॉर्म परत आला, ही ऑस्ट्रेलियासाठी चांगली गोष्ट आहे. डेव्हिड वार्नर गेल्या अनेक दिवसांपासून मैदानात संघर्ष करताना आपण पाहिले आहे. परंतु, डेव्हिड वार्नर आज ज्याप्रकारे फलंदाजी केली. त्याला अशाच खेळीसाठी ओळखले जाते. 


संबंधित बातम्या-