India T20 Team Rankings : कसोटीसह (Test Cricket) टी20 क्रिकेट (T20 Cricket) मध्येही भारतीय संघ (Team India) पहिल्या क्रमांकावर आहे. आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया कसोटी क्रिकेट आणि टी20 क्रिकेटमध्ये अव्वल आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने तिन्ही संघांची वार्षिक क्रमवारी जाहीर केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ICC पुरुषांच्या T20 संघांच्या वार्षिक क्रमवारीत भारतीय संघ आघाडीवर आहे. आयसीसी क्रिकेट पुरुषांच्या T20 संघांच्या क्रमवारीत दोन फॉरमॅटमध्ये भारत पहिल्या स्थानावर आहे. टी20 सह कसोटी क्रिकेटमध्येही भारताने वर्चस्व गाजवलं आहे.
आयसीसी क्रमवारीत कसोटीसह टी20 मध्ये टीम इंडिया अव्वल
आयसीसीच्या वार्षिक टी20 क्रमवारीत भारताचा संघ प्रथम स्थानावर आहे. टीम इंडियाचे 267 गुण आहेत. भारतीय संघाला गेल्या वर्षी T20 क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरीचा फायदा झाला आहे. तर आयसीसीनं वार्षिक रँकिंग जाहीर केली आहे. यानुसार, भारत सध्या 121 गुणांसह आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल आहे, तर ऑस्ट्रेलिया 116 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
टीम इंडियाची दमदार कामगिरी
गेल्या वर्षी भारताच्या क्रिकेट संघाने टी20 क्रिकेटमध्ये चमकदार दाखवली. 2022 साली भारतीय संघाने दमदार कामगिरी करत टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. वार्षिक क्रमवारीत भारताला आणखी 2 गुण मिळाले आहेत. आता टीम इंडिया टी-20 विश्वचषक विजेत्या इंग्लंडपेक्षा 8 गुणांनी पुढे आहे.
आयसीसी टी20 रँकींग
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या पुरुष टी20 संघांच्या क्रमवारीत विश्वचषक विजेता इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाकडे 259 गुण आहेत. इंग्लंडने गेल्या वर्षी टी-20 क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली होती. भारत आणि इंग्लंड व्यतिरिक्त न्यूझीलंडचा संघ 256 गुणांसह तिसऱ्या, पाकिस्तानचा संघ 254 गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिका संघ 253 गुणांसह पाचव्या, ऑस्ट्रेलिया संघ 248 गुणांसह सहाव्या, वेस्ट इंडिज 238 गुणांसह सातव्या, श्रीलंकेचा संघ 237 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे. संघ आठव्या, बांगलादेशचा संघ 222 गुणांसह नवव्या आणि अफगाणिस्तानचा संघ 219 गुणांसह 10व्या स्थानावर आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :