ICC Player Of the Month : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा फॉर्मात परतला आहे आणि त्याने पुन्हा एकदा आपला कमाल खेळ जगाला दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियात सुरु टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) विराट अप्रतिम खेळी करत असल्याने त्याला यंदाच्या आयसीसी प्लेयर ऑफ द मंथसाठी (ICC Player of the motnh) नॉमिनेट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हा पुरस्कार सुरु झाल्यानंतर विराट पहिल्यांदाच नॉमिनेट झाला आहे. कारण मागील जवळपास दोन वर्षे विराट खराब फॉर्मात होता आणि त्याच काळात हा पुरस्कार सुरु झाला. ज्यामुळे अद्याप विराट नॉमिनेट झाला नव्हता. आता तो परत फॉर्मात परतल्यामुळे थेट नॉमिनेट झालाच आहे तसंच पुरस्काराचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
विराटसोबत वर्ल्डपमध्ये चांगली कामिगिरी करणारे आणखी दोन खेळाडूही नॉमिनेट झाले असून यामध्ये झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांचा समावेश आहे. सिकंदर हा तर झिम्बाब्वे संघासाठी कमाल अष्टपैलू खेळी करत आहे. झिम्बाब्वेने यंदा उल्लेखनीय कामगिरी केली असून यामध्ये सिकंदरचा मोठा वाटा आहे. मिलरही दक्षिण आफ्रिकेसाठी उत्तम खेळी करत असून भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला होता.
आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड
आयसीसीनं (ICC) क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये भारताची जेमिमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा आणि पाकिस्तानच्या निदा दार यांना नामांकित करण्यात आलं आहे.
हे देखील वाचा-