T20 World Cup 2022 Match Live Streaming : टी20 विश्वचषक 2022(T20 World Cup 2022) स्पर्धा आता अगदी रंगतदार सुरु असून दररोज चुरशीचे सामने होत आहेत. आजही सुपर 12 फेरीत ग्रुप 2 मधील पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका (PAK vs RSA) हा सामना रंगणार आहे. आजचा सामना पाकिस्तानने गमावल्यास त्यांच स्पर्धेतील आव्हान संपेल तर दक्षिण आफ्रिका थेट सेमीफायनलमध्ये जाईल. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या पराभवामुळे भारताची सेमीफायनलमध्ये जागाही फिक्स होईल. त्यामुळं ग्रुप 2 साठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा महत्त्वाचा सामना कधी, कुठे पाहता येईल ते जाणून घेऊ...  

कधी होणार सामना?

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा टी20 विश्वचषक सुपर 12 फेरीतील सामना आज अर्थात 3 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

कुठे होणार सामना?

आजचा हा पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथील क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.  

कुठे पाहता येणार सामना?

या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे अपडेट्स पाहता येतील.   

कशी आहे ग्रुप 2 टी गुणतालिका?

क्रमांकसंघसामनेविजयपराभवअनिर्णितगुणनेट रनरेट
1भारत43106+0.730
2दक्षिण आफ्रिका32015+2.772
3बांगलादेश42204-1.276
4झिम्बाब्वे41212-0.313
5पाकिस्तान31202+0.765
6नेदरलँड्स41302-1.233

हे देखील वाचा-