अष्टपैलूंचा भरणा... भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचे कोणते 11 शिलेदार मैदानात उतरणार
ट्रेविस हेड दुखापतग्रस्त आहे. विश्वचषकाच्या मध्यापर्यंत हेडची खेळण्याची शक्यता नाहीच.
Australia Playing 11 : यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाला विश्वचषकाचे प्रबळ दावेदार म्हटले जातेय. या दोन्ही संघामध्ये रविवारी, 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये आमनासामना होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर विजयासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार आहेत. भारताविरोधात ऑस्ट्रेलियाचे कोणते 11 शिलेदार उतरु शकतात, याबाबत जाणून घेऊयात...
डेविड वॉर्नरसोबत सलामीला कोण ?
ट्रेविस हेड दुखापतग्रस्त आहे. विश्वचषकाच्या मध्यापर्यंत हेडची खेळण्याची शक्यता नाहीच. त्यामुळे डेविड वॉर्नरसोबत सलामीला कोण येणार? याबाबत ऑस्ट्रेलियाच्या संघाचे टेन्शन वाढलेय. हेडच्या अनुपस्थितीत मिचेल मिचेल मार्श सलामीला येऊ शकतो. भारताविरोधात झालेल्या वनडे मालिकेत मार्शने सलामीची जबाबदारी पार पाडली होती. अखेरच्या वनडे सामन्यात त्याने 96 धावांची खेळी केली होती. तर सराव सामन्यात स्टिव्ह स्मिथने सलामीची भूमिका बजावली होती. विश्वचषकात डेविड वॉर्नरसोबत सलामीला कोण उतरणार... हे रविवारीच स्पष्ट होईल. पण सध्याच्या स्थितीमध्ये डेविड वॉर्नर आणि मिचेल मार्श सलामीला येण्याची शक्यता आहे. तिसऱ्या क्रमांकावर स्टिव्ह स्मिथ फलंदाजीला उतरु शकतो.
मॅक्सवेलमुळे ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली -
ग्लेन मॅक्सवेलच्या कमबॅकमुळे ऑस्ट्रेलियाची ताकद वाढली आहे. मॅक्सवेल गोलंदाजी आणि फलंदाजीत योगदान देईल. मॅक्सवेल कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणार.. याबाबत स्पष्टता नाही. कॅमरुन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, स्मिथ, अॅलेक्स कॅरी यासारखे फलंदाजही संघात आहेत. लाबुशनलेना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.
गोलंदाजीत कोण कोण ?
फिरकीमध्ये एडम जम्पा हा स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज आहे. त्याच्या जोडीला मॅक्सवेल आणि लाबुशेन असतीलच. त्याशिवाय मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल.
भारताविरोधात ऑस्ट्रेलियाच्या संघात कोण कोणते 11 शिलेदार ?
डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव स्मिथ,ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), एडम जम्पा, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवुड.
5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाचा शुभारंभ -
5 ऑक्टोबर रोजी क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होणार आहे. गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत होणार आहे. 19 नोव्हेंबर रोजी महाअंतिम सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान हा हायहोल्टेज सामनाही अहमदाबाद येथेच होणार आहे. यंदाचा विश्वचषक दहा संघामध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक संघाचे कमीतकमी नऊ सामने होणार आहेत. त्यानंतर आघाडीच्या चार संघामध्ये सेमीफायनलचे सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबर रोजी मेगा फायनल होणार आहे.