Shubman Gill ODI Ranking : द्विशतकवीर शुभमन गिल (Shubman Gill) यानं याचे आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. चेस मास्टर विराट कोहलीला मागे टाकत आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10 मध्ये एन्ट्री केली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) क्रमवारीत एका अंकांनी घसरण झाली आहे. न्यूझीलंडविरोधात तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत शुभमन गिल (Shubman Gill) यानं 360 धावांचा पाऊस पाडला होता. यामध्ये एक द्विशतक आणि एक शतक झळकावलं होतं. या कामिरीमुळे गिल याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले होतं. आयसीसीनं नुकतेच एकदिवसीय क्रमवारी जारी केली. यामध्ये शुभमन गिल याला 20 गुणांचा फायदा झाला आहे. शुभमन गिल याने सहाव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर विराट कोहली सातव्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीच्या टॉप 10 फलंदाजामध्ये तीन भारतीय फलंदाज आहेत. शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्याशिवाय रोहित शर्माही आयसीसीच्या क्रमवारीत टॉप 10 फलंदाजामध्ये सामील आहे.
दोन आठवड्यापूर्वी श्रीलंकाविरोधात झालेल्या मालिकेतही शुभमन गिल यानं खोऱ्यानं धावा काढल्या होत्या. या कामगिरीमुळे शुभमन गिल यानं आयसीसीच्या क्रमवारीत 26 व्या स्थानावर झेप घेतली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरोधातील मालिकेत शुभमन गिल याने 180 च्या सरासरीने 360 धावांचा पाऊस पाडला. या कामगिरीमुळे गिल याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. तसेच त्याने आयसीसीच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली. शुभमन गिल याने 20 गुणांची कमाई करत आयसीसीच्या क्रमवारीत थेट सहाव्या क्रमांकावर कब्जा केला.
शुभमन गिल याने आतापर्यंत फक्त 21 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 73.76 च्या जबरदस्त सरासरीने आणि 109.80 च्या स्ट्राइक रेटनं 1254 धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण करणारा फलंदाजही झालाय. 21 एकदिवसीय सामन्यात शुभमन गिल याने चार शतकं झळकावली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचा समावेश आहे.
रोहित शर्मालाही फायदा -
मागील एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्मा 10 व्या क्रमांकावर होता. न्यूझीलंडविरोधात अखेरच्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मानं शतकी खेळी केली होती. त्यामुळे त्याला आयसीसीच्या क्रमवारीत फायदा झाला आहे. रोहित शर्मा सध्या नवव्या क्रमांकावर विराजमान आहे. एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबार आझम पहिल्या स्थानावर आहे. तर रासी वान डेर डूसन (766) दुसऱ्या तर क्विंटन डिकॉक (759) तिसऱ्या क्रमांकावर आहे. डेविड वॉर्नर आणि इमाम उल हक चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. शुभमन गिल सहाव्या तर विराट कोहली सातव्या क्रमांकावर आहे.
आणखी वाचा :
Mohammed Siraj : मोहम्मद सिराज सुसाट, एकदिवसीय क्रमवारीत पटकावलं अव्वल स्थान
ICC Rankings : किवींना व्हाईट वॉश अन् टीम इंडिया पहिल्या स्थानावर