ICC Rankings: इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील तिसऱ्या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला आहे. यासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं किवींना व्हाईट वॉश दिला. टीम इंडियाच्या 386 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 295 धावांवर आटोपला. भारतानं न्यूझीलंडला धूळ चारत आयसीसीच्या एकदिवसीय संघाच्या क्रमवारीत अव्वल स्थान काबिज केले आहे. आयसीसीच्या टी20 रँकिंगमध्ये टीम इंडिया याआधीच पहिल्या स्थानावर होती. आता एकदिवसीय क्रमवारीतही पहिल्या स्थानावर पोहचली आहे. कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाला व्हाइट वॉश देत पहिल्या स्थानावर पोहचण्याची टीम इंडियाकडे संधी आहे.
याआधी श्रीलंकेला चारली होती धूळ -
न्यूझीलंडचा पराभव करण्याआधी टीम इंडियानं श्रीलंकेला धूळ चारली होती. तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियानं श्रीलंकेला 3-0 च्या फराकानं पराभूत केले होते. या वर्षात भारताने आतापर्यंत 6 एकदिवसीय सामने खेळले असून एकाही सामन्यात पराभूत झालेला नाही. आयसीसीच्या क्रमवारीत टीम इंडियाकडे 114 रेटिंग पॉईंट्स आहेत. तर न्यूझीलंडचे 111 गुण आहेत. त्याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे 112 गुण आहेत. 113 गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडला अव्वल स्थानावर पोहचण्याची संधी -
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेत इंग्लंड संघानं दक्षिण आफ्रिकेचा 3-0 च्या फरकानं पराभव केला तर भारताचं अव्वल स्थान जाणार आहे. इंग्लंडनं 3-0 च्या फराकानं विजय मिळवला तर ते पहिल्या स्थानावर जातील.
भारताची मोठी झेप
न्यूझीलंडविरोधात मायदेशात झालेल्या एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडिया क्रमवारीत चौथ्या स्थानावर होती. तर न्यूझीलंड पहिल्या क्रमांकावर होते. पण भारताने 3-0 च्या फराकाने धूळ चारल्यामुळे न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहचलाय. आयसीसीनं ट्विट करत टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल दहा संघ
भारत, इंग्लंड,ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज
विराट कोहली चौथ्या क्रमांकावर
आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहलीनं टॉप 5 मध्ये एन्ट्री केली आहे. विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहचला आहे. कोरोना काळात खराब कामगिरीनंतर विराट कोहलीच्या क्रमवारीत घसरण झाली होती. पण मागील काही दिवसांपासून विराट कोहलीनं खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. परिणामी विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर आहे.
न्यूझीलंडला व्हाइट वॉश
तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेत भारतानं न्यूझीलंडचा 3-0 च्या फरकाने पराभव केला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवरील तिसऱ्या वनडेत भारताचा न्यूझीलंडवर 90 धावांनी विजय मिळवला. तर हैदराबाद येथे झालेल्या हाय स्कोरिंग सामन्यात भारताने 12 धावांनी विजय मिळवला होता. रायपूर येथील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने न्यूझीलंडचा आठ गड्यांनी पराभव केला होता.
आणखी वाचा :
गिल-रोहितच्या शतकानंतर शार्दुल-कुलदीपचा भेदक मारा, भारताचा किवींना व्हाईट वॉश